Sharad Pawar : शरद पवारांची ‘दादा’गिरी नक्की कुणावर?

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार लोणावळ्यातील सभेत बोलताना अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांना भर सभेतून धमकी दिली.

130
Sharad Pawar यांना नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल का केले?
Sharad Pawar यांना नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल का केले?

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) लोणावळ्यातील सभेत बोलताना अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांना भर सभेतून धमकी दिली. त्यानंतर आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी ही धमकी कोणामुळे आणि कशासाठी दिले, यावर चर्चा सुरु झाली आहे. तसे पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले शरद पवार संयमी नेतृत्व असल्याच बोललं जातं. अशा प्रकारे भर सभेत शरद पवार (Sharad Pawar) कधीच कोणाच्या विरोधात थेट इशारे देऊन बोललेले दिसून आले नाही. परंतु एवढ्या वर्षानंतर शरद पवारांवर अशी वेळ का आली, याचे देखील नेमकस कारण काय आहे?

(हेही वाचा – Rahul Narvekar म्हणतात, आमदार अपात्रतेवर दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकषानुसारच)

शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर अजित पवार गटात असलेले आमदार सुनील शेळके बारामती मतदारसंघाला लागूनच असलेल्या मावळ मतदारसंघात आहेत. परंतु बारामती लोकसभा मतदारसंघाच्या शेजारी असल्यामुळे त्यांचा प्रभाव हा खडकवासला विधानसभा क्षेत्र तसेच मावळजवळ असल्याने त्या भागात मोठा प्रभाव आहे. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात या दोन्ही मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्यावेळी सुनील शेळके हे भाजपाचे होते आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार यांनी सुनील शेळके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणले. याच कारणाने पुन्हा एकदा सुनील शेळके हे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीच्या काळात मतांसाठी मोठी मदत करू शकतात, हे शरद पवार (Sharad Pawar) यांना चांगले ठाऊक आहे. त्यामुळेच आताच सुनील शेळके यांना दबावात ठेवल्यास लोकसभा निवडणुकीच्या काळात मोठा फटका सुप्रिया सुळे यांना बसणार नाही याची काळजी शरद पवार घेत असल्याचे दिसून येत आहे. मेळाव्याला येऊ नये, म्हणून कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यावरून शरद पवारांनी (Sharad Pawar) सुनील शेळके यांना इशारा देत सुनावले. या इशाऱ्यानंतर सुनील शेळके यांनी देखील पवारांना चॅलेंज दिले आहे. कुणाला दम दिला? एक तरी व्यक्ती आणून दाखवा, अन्यथा सर्व आरोप खोटे केल्याचे राज्यभर सांगणार, असे शेळकेंनी म्हटले. यावर सुप्रिया सुळेंनी शेळकेंना प्रतिआव्हान दिले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.