Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्ष आणि भागोजी कीर जयंतीनिमित्त पुतळा अनावरण सोहळ्याचे आयोजन

176
Veer Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्ष आणि भागोजी कीर जयंतीनिमित्त पुतळा अनावरण सोहळ्याचे आयोजन
Veer Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्ष आणि भागोजी कीर जयंतीनिमित्त पुतळा अनावरण सोहळ्याचे आयोजन

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (Veer Savarkar) आणि अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी, ८ मार्चला महामानव भागोजी कीर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि अभिवादन सोहळ्याचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात करण्यात आले आहे.हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमींनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, यासाठी सावरकर स्मारकात बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

ब्रिटिशांच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महामानव भागोजी कीर हे जीवलग मित्र होते. भागोजी कीर यांना जाऊन ८० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी वीर सावरकर यांच्याबरोबर स्वातंत्र्यलढ्यात कार्य केलं आहे. त्यांचं काळाच्या आड लपलेलं कार्य जगासमोर यावं या उद्देशाने आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुक्ती शताब्दी वर्षानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ‘मैत्र जीवांचे’ या उपक्रमाअंतर्गत या दोन महापुरुषांच्या पुतळ्याचे अनावरण आणि अभिवादन सोहळा होणार आहे. १९१९ साली प्लेग या महामारीच्या काळात भागोजी कीर यांनी शिवाजी पार्क येथे ९ एकर जागा दान करून हिंदुंची स्मशानभूमी उभारली. आज त्या जागेत चैत्यभूमी, महात्मा गांधी तरण तलाव, नाना नानी पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक या वास्तू उभ्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात वीर सावरकर यांच्या संकल्पनेतील रत्नगिरी येथे पतीत पावन मंदिर बांधून सहभोजन आणि सहभजन यासारखे कार्यक्रम राबवले. आज हिंदू धर्माचे प्रतीक म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. अशा अनेकविध समाजोपयोगी समर्पणाने केलेल्या कार्याची आणि अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाने केलेल्या पाठपुराव्याची योग्य ती दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असून, महामानव भागोजी कीर यांचे कर्तृत्व भावी पिढीला प्रेरणादायी ठरावे या भावनेने त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर यांनी दिली.

(हेही वाचा – Raj Thackeray : शिपिंग इंडस्ट्रीतील कामगार संघटनांमध्ये महाप्रचंड आर्थिक घोटाळे; राज ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र )

भागोजीचं चरित्र जनतेपुढे येणं आवश्यक…
जाज्वल्ल्य हिंदू धर्माचे पुरस्कर्ते तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देश-धर्माच्या संकल्पनेला मूर्त स्वरुप आणणारे देशाभिमानी महामानव भागोजी कीर यांचे चरित्र जनतेपुढे आणणं आवश्यक आहे. त्यांची जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि त्यांच्यातील दातृत्व याची ओळख होणं आवश्यक आहे. इतिहासात हे नाव कुठेही नाही त्यामुळे शालेय पाठ्यपुस्तकात भागोजी कीर यांच्याविषयीचा इतिहास मुलांना शिकवणं आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या महेश कुलकर्णी यांनी केले, तर त्यांचा जन्म आणि मृत्यू एकाच दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी झाला, असा दुर्मिळ योग फक्त योगी महापुरुषांच्याच वाट्याला येत असतो. अतिशय गरिबी आणि हालअपेष्टांचे जीवन जगलेल्या भागोजी कीर यांनी त्यांना त्यांच्या आयुष्यात मिळालेल्या संधीचे सोने केले, हे लोकांना कळणं आवश्यक आहे, यासंदर्भातील माहीती पत्रकार परिषदेत भागोजी कीर स्मृती समितीचे प्रमुख किशोर केळसकर यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे नविनचंद्र बांदिवडेकर, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे प्रकाश कांबळी आणि भागोजी कीर स्मृती समितीचे प्रमुख किशोर केळसकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे महेश कुलकर्णी उपस्थित होते.

जीवनपट उलगडला सोहळा
शुक्रवारी, ८ मार्चला दुपारी २.३० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर सभागृहात वीर सावरकर आणि महामानव भागोजी कीर या महापुरुषांच्या पुतळ्यांचा अनावरण आणि अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी, जलमार्ग तथा पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पालकमंत्री दीपक केसरकर, काडसिद्धेश्वर महाराजांचे शिष्य अविनाश महाराज, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदाभाऊ सरवणकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, अंकुर कीर, डॉ. प्रा. प्रदीप ढवळ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. अभिवादन आणि अनावरण सोहळ्यावेळी महामानव भागोजी कीर यांचा भगवदगीतेतील संदर्भ देऊन त्यांचा जीवनपट उलगडला जाणारा आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.