‘माझा टॅक्सी ड्रायव्हर नोकरीपेक्षा गाडी चालवून जास्त पैसे मिळवतो,’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

एक टॅक्सी ड्रायव्हर जो नोकरीपेक्षा जास्त पैसे टॅक्सी चालवून कमावतो

125
‘माझा टॅक्सी ड्रायव्हर नोकरीपेक्षा गाडी चालवून जास्त पैसे मिळवतो,’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल
‘माझा टॅक्सी ड्रायव्हर नोकरीपेक्षा गाडी चालवून जास्त पैसे मिळवतो,’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल
  • ऋजुता लुकतुके

मार्केटिंग क्षेत्रातील आघाडीच्या मार्गदर्शक आणि लेखिका श्वेता कुकरेजा यांनी अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी एका टॅक्सी ड्रायव्हरचं उदाहरण दिलंय जो नोकरीपेक्षा जास्त पैसे टॅक्सी चालवून कमावतो. ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. कोविड १९ नंतरच्या काळात नोकरी धंद्यातल्या मंदीमुळे अनेकांना नोकरीबरोबरच आणखी काही जोड धंदा करण्याची वेळ आली. तर काहींना क्षेत्रच बदलावं लागलं. ‘पापी पेट का सवाल है’ म्हणत असे सगळे अनुभव घेत माणसाचं आयुष्य पुढे सुरू आहे.

अशाच एका माणसाचा कथा श्वेता कुकरेजा या मार्केटिंग तज्ज्ञ महिलेनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर अलीकडेच शेअर केली आहे. ही कहाणी आहे एका टॅक्सी चालकाची कहाणी. म्हटलं तर यशोगाथा, म्हटलं तर कर्मकहाणी. श्वेता कुकरेजा लिहितात, ‘कालचा माझा टॅक्सी चालक एक इंजिनिअर होता. अमेरिकन कंपनी क्वालकॉममध्ये काम केलेला हा तरुण मला सांगत होता की, नोकरीपेक्षा टॅक्सी चालवून तो जास्त पैसे कमावतो.’ क्वालकॉम ही अमेरिकेतील एक आघाडीची सेमी कंडक्टक तसंच सॉफ्टवेअर आणि सेवा क्षेत्रातील कंपनी आहे. कोविडनंतर या व्यक्तीची नोकरी गेली. आणि तो टॅक्सी चालवायला लागला. आणि आता तो नोकरीपेक्षा जास्त कमावतो असं त्याचं म्हणणं आहे.

(हेही वाचा – Inflation in India : देशाचा किरकोळ महागाई दर ६ टक्क्यांच्या वर जाण्याचा अंदाज)

कुकरेजा यांनी ६ ऑगस्टला केलेली ही पोस्ट हळू हळू खूपच व्हायरल झाली. तिला जवळ जवळ ८ लाख लोकांनी पाहिलं आहे. ३०० च्या वर लोकांनी ही पोस्ट रिपोस्ट केली आहे. तर ३,००० च्या वर प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत. बहुतेकांचं म्हणणं सारखंच आहे. एका व्यक्तीने लिहिलंय की, ‘त्यांच्या सोसायटी जवळचा पाणीपुरीवाला महिन्याला ३-४ लाख रुपये कमावतो. त्याचं शिक्षण आहे सहावी पास.’ तर आणखी एक वाचक म्हणतो, ‘आमच्याकडे टोरंटोमध्येही अशीच परिस्थिती आहे.’ काही जणांनी ही पोस्ट नेमकी खरी आहे का यावर अविश्वास दाखवला आहे. तर काहींनी इंजिनिअरच्या दर्जाविषयीही शंका घेतली आहे. स्वत: कुकरेजा यांनी एका थ्रेडला पुन्हा उत्तर देताना, ‘कुठलीही नोकरी हलकी नसते. आणि इंजिनिअर असणं म्हणजे जास्त प्रतीष्ठेचं आणि ड्रायव्हर म्हणजे कमी प्रतीष्ठेचं हे समजणंही चुकीचं आहे,’ असं म्हटलं आहे. या उत्तरालाही नेटकऱ्यांनी लाईक्स दिले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.