Tiger death :गोंदिया येथे कारच्या धडकेत वाघाचा मृत्यू

जंगलपरीक्षेत्रानजीकच्या वाहनांच्या वेगमर्यादेवर आळा घालण्याची वन्यप्रेमींची मागणी

69
Tiger death :गोंदिया येथे कारच्या धडकेत वाघाचा मृत्यू
Tiger death :गोंदिया येथे कारच्या धडकेत वाघाचा मृत्यू

गोंदिया येथील कोहमारा महामार्गावर कारची धडक लागून (Tiger) वाघाचा (death) मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (११ ऑगस्ट) रात्री घडली. साधारण साडेदहाच्या दरम्यान अपघाताने व्हिवळलेल्या वाघाला प्रचंड भेदरलेल्या अवस्थेत लंगडत रस्ता पार करत असल्याचा व्हिडिओ व्हरायल झाला होता. व्याघर क्षेत्र तर जंगलनजीकच्या भागातून वाहनाना प्रवास करताना केवळ २० किलोमीटर ताशी वेगाने वाहन चालवण्याची मर्यादा असते. मात्र बरेचदा वाहनचालक ही मर्यादा पाळताना दिसत नाही. परिणामी, वन्यप्राणी रस्ता पार करताना ते दगावतात. या प्रकरणानंतर जंगलपरीक्षेत्रानजीकच्या वाहनांच्या वेगमर्यादेवर आळा घालण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.

नेमकी घटना काय?

गोंदिया-कोहमारा हायवे मधील मुर्दोली परिसरात गुरुवारी रात्री कारच्या धडकेत वाघ Tiger गंभीर झाल्याचे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पाहिले. याबाबतीत एका प्रवाशाने वनविभागाला माहिती दिली.रात्री उशिरा जंगलातील झुडपात लपलेल्या वाघाचा पकडण्याच्या शोधकार्यात गोंदिया वनविभागाच्या वनाधिकाऱ्यांना खूप अडचणी आल्या. सकाळी पाच वाजता वाघाला पकडण्याचे शोधकार्य पुन्हा सुरु करण्यात आले. सकाळी सातच्या सुमारास जखमी अवस्थेतील वाघाला बेशुद्ध करून वनाधिकाऱ्यांनी पकडले. त्याला उपचारासाठी तातडीने नागपूर येथील गोरेवाडा प्राणीसंग्रहालय येथील वन्यप्राणी बचाव केंद्रात नेण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी प्रवास सुरु केला. परंतु वाटेतच वाघाचा मृत्यू झाला.

(हेही वाचा : Independence Day : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची कारागृहातून सुटका)
हा वाघ Tiger दोन वर्षांचा असून, नवेगावनागझिरा येथील T१४ वाघिणीचा निम्नवयस्क बछडा होता. हा वाघ नवेगाव नागझिरा व्याघर प्रकल्पाच्या बाहेरील बफर झोनमध्ये राहत होता, असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. वाघाच्या बचावकार्यात गोंदिया वन विभागाचे उपवसंरक्षक प्रमोद पांचभाई , विभागीय अधिकारी अतुल देवकर, मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर, सहायक वनंरक्षक राजेंद्र सदगिर, वन परिक्षेत्र अधिकारी रवी भगत, साकोली-नवेगाची जलद गती प्रतिसाद टीम यांचा सहभाग होता.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.