Independence Day : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची कारागृहातून सुटका

केंद्रीय गृह सचिवाकडून माहिती

99
Independence Day : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची कारागृहातून सुटका
Independence Day : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची कारागृहातून सुटका

मंगळवारी, १५ आॅगस्ट रोजी देशाचा ७६ वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांना तीन टप्प्यांमध्ये सवलत देण्यात यणार आहे. या सवलतीच्या तिसऱ्या टप्प्यानुसार स्वातंत्र्यदिनी १८६ कैद्यांना विशेष सवलत देऊन कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत. भारत सरकारच्या केंद्रीय गृह सचिवाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

स्वातंत्र्यदिनी मुक्त करण्यात येणाऱ्या कैद्यांना केंद्र शासनाच्या निर्देशानुसार वयाची ६० वर्ष पूर्ण केलेले पुरूष बंदी, ज्यांनी एकूण शिक्षेच्या ५० टक्के कालावधी पूर्ण केलेले ७ बंदी आहेत. तरुण गुन्हेगार १२ ते २१ वर्षे वयात गुन्हा केला, त्यानंतर कोणताही गुन्हा केला नाही व ज्यांनी एकूण शिक्षेच्या ५० टक्के कालावधी पूर्ण केलेले १० बंदी आहेत. हे बंदी माफी वगळता आहेत. निर्धन आणि दीन बंदी, ज्यांनी शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे, परंतु दंडाची रक्कम भरण्यास असमर्थ असलेले २ बंदी, तसेच ज्यांनी एकूण शिक्षेच्या कालावधीपैकी दोन तृतीयांश अथवा ६६ टक्के कालावधी पूर्ण करणारे १६७ बंदी आहेत.

योजनेचा उद्देश
माफी योजनेचा उद्देश हा कैद्यांमध्ये कारागृहातील शिस्त आणि आचरण निश्चित करणे. तसेच कारागृहातून प्रोत्साहन स्वरूपात लवकरात लवकर सुटका करणे हा आहे. यामुळं कैद्यांनी गुन्हेगारी सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनण्याकरीता प्रोत्साहन मिळणार आहे. केंद्रीय गृह सचिवाकडून माफी योजनेचे स्वरूप व निकष विहित केले आहेत. राज्यातील कैद्यांची पात्रता तपासण्यासाठी ९ जून २०२२ च्या शासन निर्णयान्वये अपर मुख्य सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तपासणी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमार्फत शिफारस करण्यात आलेल्या बंद्याच्या प्रस्तावास राज्यपाल यांची मान्यता घेण्यात आली आहे.

(हेही वाचा – Anger : रागावर नियंत्रण ठेवण्याचा सोपा उपाय जाणून घ्या…)

तीन टप्प्यात ५८१ बंद्यांची कारागृहातून मुक्तता
पहिल्या टप्प्यामध्ये १५ ऑगस्ट २०२२ रोजी २०६, दुसऱ्या टप्प्यामध्ये २६ जानेवारी २०२३ रोजी १८९ बंद्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आले आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यामध्ये १५ ऑगस्ट २०२३ रोजी १८६ बंद्यांना विशेष माफी देऊन कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश शासनाने दिले आहेत. अशा प्रकारे तीन टप्प्यामध्ये एकूण ५८१ बंद्यांना विशेष माफी देऊन कारागृहातून मुक्त करण्यासंबंधीची कार्यवाही राज्य शासनामार्फत करण्यात आली आहे.
कारागृहनिहाय सुटकेस पात्र बंदी
येरवडा जि. पुणे खुले जिल्हा कारागृह १, येरवडा मध्यवर्ती कारागृह १६, नाशिक रोड जि. नाशिक मध्यवर्ती कारागृह ३४, ठाणे मध्यवर्ती कारागृह १, नागपूर मध्यवर्ती कारागृह २३, अमरावती खुले कारागृह ५, अमरावती मध्यवर्ती कारागृह १९, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह ५, कोल्हापूर खुले ५, जालना ३, पैठण खुले २, औरंगाबाद खुले २, औरंगाबाद मध्यवर्ती २४, सिंधुदुर्ग जिल्हा १३, मुंबई मध्यवर्ती ७, तळोजा मध्यवर्ती ८, अकोला ६, भंडारा १, चंद्रपूर २, वर्धा जिल्हा २, वर्धा खुले २, वाशिम १, मोर्शी जि. अमरावती खुले १, गडचिरोली ४, असे एकूण १८६ बंदी.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.