मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी शिझानचा तुनिषावर दबाव! आईचा गंभीर आरोप

87

तुनिषा शर्माच्या आईने पत्रकार परिषद घेत, तुनिषाचा मित्र आणि सहकलाकार शिझानवर गंभीर आरोप केले आहेत. शिझान सोबतच्या ब्रेकअपनंतर तुनिषा तणावात होती, तिच्या वर्तनात बदल दिसत होता. शिझान सेटवर नशा सुद्धा करायचा आणि तो तुनिषावर मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप तुनिषा शर्माच्या आईने पत्रकार परिषदेत केला आहे.

तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांचे शिझानवर गंभीर आरोप 

अभिनेत्री तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, तुनिषाने शिझानचा मोबाईल चेक केला होता, यात शिझानने त्याच्या मैत्रिणीसोबत केलेले चॅट तुनिषाला सापडले होते. याबाबत तुनिषाने त्याला विचारले असता शिझानने तिला चापट मारली आणि सांगितले की, तुला जे हवे ते कर. यानंतर माझी फसवणूक झाल्याचे तुनिषाने मला सांगितले. अशी माहिती वनिता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

आधीच एका मुलीशी संबंध असताना शिझानाने तुनिषाशी जवळीक का वाढवली असा प्रश्न मला पडला आहे. तुनिषाच्या मृत्यूला शिझानचं जबाबदार आहे. शिझानकडून तुनिषाचा मानसिक छळ होत होता. तुनिषाची हत्या झाली असू शकते असा संशय तुनिषाच्या आईने व्यक्त केला आहे. तुनिषा माझ्यावर अजिबात नाराज नव्हती. तिला कोणत्याच गोष्टीसाठी मी नकार दिला नाही, असेही तुनिषाच्या आईने सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.