मुंबईत कलम १४४ लागू! ३१ डिसेंबरला नियमांचे पालन करा अन्यथा…

102

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. अनेकांनी पर्यटनस्थळांवर गर्दी केली आहे तर काहींनी मुंबईतूनच नववर्षाला निरोप देण्याचे ठरवले आगे. तुम्ही सुद्धा ३१ डिसेंबर साजरा करणार असाल तर काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कारण मुंबई पोलिसांकडून शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहेत.

( हेही वाचा : CBSE Board : दहावी – बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर; असे डाऊनलोड करा वेळापत्रक )

तळीरामांविरोधात मोहीम

ड्रंक अँड ड्राइव्हविरोधी मोहीम यंदा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे आणि यासाठी पुन्हा ब्रिथ अनालायझरचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वाहतूक पोलिसांच्यावतीने मुंबईत सुमारे १०० टिकाणी नाकाबंदी करून मद्यपी चालकांविरुद्ध मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

आकाशकंदील, फटाक्यांवर बंदी

मुंबईत गर्दीच्या ठिकाणी, समुद्र किनारी तसेच सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. परवानगीशिवाय ड्रोन, आकाशकंदील उडविण्यास मनाई आहे. दहशतवाद आणि घातपाताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे पालन न केल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

New Project 6 11

असा असणार बंदोबस्त

  • २५ पोलीस उपायुक्त
  • ७ अतिरिक्त आयुक्त
  • १ हजार ५०० अधिकारी
  • १० हजार अंमलदार
  • SRPF च्या ४६ तुकड्या
  • शीघ्र कृती दलाची १५ पथके
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.