पोहायचे आहे का? या जलतरण तलावाचे सभासद होण्याची संधी…

207

मुंबई महानगरपालिकेच्या जलतरण तलाव सभासदत्वाची क्षमता पूर्ण झाल्याने थांबविण्यात आलेली सभासद नोंदणी प्रक्रिया पुन्हा एकदा ३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू करण्यात येत आहे. यामध्ये दादर महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक जलतरण तलाव, चेंबूर पूर्वमधील जनरल अरुणकुमार वैद्य जलतरण तलाव, दहिसर पूर्व मधील मुरबाळी जलतरण तलाव आणि कांदिवली पश्चिम येथील सरदार वल्लभभाई पटेल ऑलिम्पिक जलतरण तलाव आदी तरण तलावांचा समावेश आहे.

( हेही वाचा : मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी शिझानचा तुनिषावर दबाव! आईचा गंभीर आरोप )

जलतरण तलाव ऑनलाईन प्रणालीसाठी https://swimmingpool.mcgm.gov.in/ याठिकाणी सभासद नोंदणी प्रक्रिया नियमावली आणि दरसूची वेबसाईटवर उपलब्ध आहे. सभासदत्वासाठी प्रतिक्षा यादीची सुविधा नव्याने सुरू करण्यात येत आहे. मासिक, त्रैमासिक सभासदत्व नव्याने सुरू करण्यात येत आहे. वार्षिक सभासदाला वार्षिक सभासदत्व परत करण्याची सुविधा नव्याने उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे उपायुक्त (उद्यान) विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

  • दादर महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक जलतरण तलाव ( वार्षिक : ७०० सभासद, त्रैमासिक/मासिक : ८२५ सभासद)
  • चेंबूर पूर्व जनरल अरुणकुमार वैद्य जलतरण तलाव ( वार्षिक : ३५० सभासद, त्रैमासिक/मासिक : ५५० सभासद)
  • दहिसर पूर्व मुरबाळी जलतरण तलाव ( वार्षिक : ३३० सभासद, त्रैमासिक/मासिक : २७५ सभासद)
  • कांदिवली पश्चिम सरदार वल्लभभाई पटेल ऑलिम्पिक जलतरण तलाव : ( वार्षिक : २१७८ सभासद, त्रैमासिक/मासिक : ५५० सभासद)

नवीन सात जलतरण तलावाचे लवकरच लोकार्पण

मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आणखी सात ठिकाणी नविन जलतरण तलाव विकसित करण्यात येत असून लवकरच त्याचे लोकार्पण अपेक्षित असल्याचा विश्वास उपायुक्त (उदयान) किशोर गांधी यांनी व्यक्त केला आहे. कांदरपाडा, दहिसर (प), चाचा नेहरू मैदान, मालाड (प.), गिल्बर्ट हिल, अंधेरी (प.), कोंडिविटा गाव, अंधेरी (पू.). वरळी जलाशय टेकडी, वरळी, टागोर नगर, विक्रोळी (पू.), वडाळा अग्निशमन केंद्र, वडाळा आदी ठिकाणी ही सात जलतरण तलाव निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.