Sayajirao Diamond Jubilee Day : सयाजीरावांच्या काळात बडोदा हे मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणारे होते पहिले राज्य…

167
नरेंद्र मोदींनी शौचालय बांधण्याची प्रेरणा सयाजीराव गायकवाड यांच्याकडून घेतली. महिलांची समस्या जाणून घेऊन सयाजीरावांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक शौचालये बांधली. सयाजीरावांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कौळाणे या गावी मराठा कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव गोपाळराव गायकवाड असे होते.
सयाजीराव २५ डिसेंबर १८८१ रोजी बडोदा संस्थानच्या गादीवर बसले. सयाजीराव हे आधुनिक विचारांचे होते आणि देशभक्त होते. १८८१ ते १९३९ या काळात त्यांनी बडोद्यावर शासन केले. या त्यांच्या शासनकाळाचा गौरव करण्यासाठी Sayajirao Diamond Jubilee Day म्हणजेच सयाजीराव हीरक महोत्सवी दिन ३ जानेवारीला दरवर्षी साजरा केला जातो. त्यांचे शासन हे अतिशय उत्तम होते.
त्यांनी त्यांच्या शासनकाळात अनेक सुधारणा केल्या. अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या. विशेष म्हणजे न्यायव्यवस्थेत देखील त्यांनी सुधारणा केल्या. खासकरुन त्यांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारुन दाखवली. ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन त्यांनी केले. संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण करणारे बडोदा हे पहिले राज्य ठरले.
त्यांनी अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. त्यांनी डॉ. आंबेडकरांना शिष्यवृत्ती देखील दिली होती. पडापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रयबंदी, स्त्रियांना वारसा हक्क मिळण्याचा अधिकार, अस्पृश्यता निवारण, विधवाविवाह इत्यादी अनेक सुधारणा त्यांनी घडवून आणल्या.
त्यांनी औद्योगिक कलाशिक्षणासाठी ’कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली. त्याचबरोबर गावोगावी ग्रंथालयांची निर्मिती केली. सयाजीराव गायकवाड यांचा शासनकाळ हा सर्वोत्तम मानला जातो. ते खर्‍या अर्थाने पुरोगामी होते. म्हणूनच त्यांच्या शासनकाळाचा गौरव करण्यासाठी सयाजीराव हीरक महोत्सवी दिन (Sayajirao Diamond Jubilee Day) साजरा केला जातो.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.