चीनी कविता गुजरातीत अनुवादित करणारे कवी Harish Meenashru

154

हरीष मीनाश्रू (Harish Meenashru) हे गुजराती साहित्यातील एक आघाडीचे नाव. त्यांचे खरे नाव हरीष कृष्णराम दवे असे आहे. मात्र कवितांसाठी त्यांनी हरीष मीनाश्रू हे नाव वापरले आणि त्याच नावाने ते प्रसिद्ध आहेत. मीनाश्रू यांचा जन्म ३ जानेवारी १९५३ रोजी गुजरातमधील आनंद येथे झाला. त्यांनी दादाभाई नवरोजी हायस्कूल येथून शिक्षण घेतले.

पुढे व्ही.पी. सायन्स कॉलेज, वल्लभ विद्यानगर येथून रसायनशास्त्रात बी.एससी. पूर्ण केली आणि १९७० ते १९७३ या काळात पटेल सायन्स कॉलेमधून एम. बी. पूर्न केली. त्यानंतर Harish Meenashru यांनी सरदार पटेल विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातून एम. एससी. चे शिक्षण घेतले. त्यांनी १९७७ मध्ये बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करायला सुरुवात केली. मार्च २००१ मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून स्वेच्छेने निवृत्त झाले.

लहानपणापासूनच त्यांना लिखाणाची आवड होती. त्यांनी पहिली कविता पाचवीत असताना लिहिली. १९७४ मध्ये त्यांची छाडियानू दुकालगीत ही कविता गुणवंत शाह यांनी संपादित केलेल्या नूतन शिक्षण मासिकात प्रकाशित झाली. १९८८ मध्ये धृबांगसुंदर एनी पेरे डोल्या हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर ते चांगलेच नावारुपाला आले. पुढे तांबूल, पर्जन्यसुक्त, सुनो भाई साधो, पद प्रांजली. पंखीपदरथ, बनारस डायरी असे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झाले.

(हेही वाचा Goa : धर्मांतर केल्याच्या आरोपाखाली पाद्री डॉमिनिक डिसोझा याला अटक)

ते गुजराती गझल, गीत आणि मुक्त छंदातील कविता लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहेत. नखशिखा आणि शेष-विशेष हे गझल संग्रह म्हणजे गुजरतई आधुनिक गझलांचा पाया आहेत. त्यांच्या कवितांचे इंग्रजीत देखील भाषांतर झाले आहे. Harish Meenashru यांनी आठव्या शतकातील चिनी कवी वांग वेई आणि निकाराग्वामधील कवी पाब्लो अँटोनियो क्वाद्रा यांच्या कवितांचा गुजराती अनुवाद केला आहे. त्यामुळे गुजराती साहित्य-विश्वात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली.

Harish Meenashru यांच्या साहित्य क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार, नरसिंह मेहता पुरस्कार, वली गुजराती गझल पुरस्कार, कापाली पुरस्कार आणि तखसिंह परमार पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.