Ram Navami 2024 : जय श्रीराम… जाणून घेऊया राम जन्माची कथा…

श्रीरामाला मनुष्य असून भगवान का म्हटले जाते. तर मनुष्याने कसे असले पाहिजे, म्हणजे मनाने भगवंताच्या जवळ जाता येते. म्हणजेच भगवंताशी एकरूप होता येते. याचे आदर्श उदाहरण म्हणजे श्रीराम.

112
Ram Navami 2024 : जय श्रीराम... जाणून घेऊया राम जन्माची कथा...

हिंदू वर्षातील चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीच्या दिवशी राम नवमी साजरी केली जाते. या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. चैत्रातील पाडवा ते राम नवमी हे नऊ दिवस चैत्र नवरात्र म्हणून साजरे करतात. या दिवसांत देवीची उपासना केली जाते. राम नवमी (Ram Navami) हा चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस होय. आपण राम जन्माची कथा थोडक्यात जाणून घेऊयात. (Ram Navami 2024)

आपल्या हिंदू धर्मात देवांचे प्रेषित येत नाहीत. तर देव स्वतः पृथ्वीवर अवतार घेतात आणि पृथ्वीवरच्या लोकांना आदर्श घालून देतात. जीवनाची मूल्ये आणि तत्वे सांगतात. त्रेतायुगात रावणाचा अत्याचार वाढला होता. तो समूळ नष्ट करण्यासाठी भगवान विष्णूंनी पृथ्वीवर मनुष्याच्या रुपात अवतार घेतला. तो मनुष्य म्हणजे भगवान श्रीराम. (Ram Navami 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : पंजाबमध्ये 13 जागांसाठी चौरंगी मुकाबला; शिअद-भाजपा पहिल्यांदाच स्वतंत्र लढणार)

श्रीरामाला मनुष्य असून भगवान का म्हटले जाते. तर मनुष्याने कसे असले पाहिजे, म्हणजे मनाने भगवंताच्या जवळ जाता येते. म्हणजेच भगवंताशी एकरूप होता येते. याचे आदर्श उदाहरण म्हणजे श्रीराम. म्हणून त्यांना भगवान आणि प्रभू म्हणून संबोधलं जातं. रामायणात लिहिल्याप्रमाणे दशरथ राजाला तीन राण्या होत्या. कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. पण त्यांना मुलं नव्हती. म्हणून दशरथ राजाने पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. (Ram Navami 2024)

दशरथ राजाने केलेल्या यज्ञाने प्रसन्न होऊन अग्नी देवाने दशरथ राजाला पुत्रप्राप्तीचं वरदान दिलं. अग्निदेवांचा आशीर्वाद इतका फळला की, दशरथ राजाला चार मुलं झाली. ती मुलं म्हणजे राम, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत. राम आपल्या भावंडांमध्ये सर्वात मोठा होता. श्रीरामाचा जन्म दुष्टांचा संहार करण्यासाठी झाला होता. राम नवमीच्या दिवशी लोक मोठ्या श्रद्धेने श्रीरामाची पूजा अर्चना करतात. पवित्र नद्यांमध्ये स्नानादी कर्म करून आनंद साजरा करतात. (Ram Navami 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.