नवले पूल अपघात: अखेर 100 पोलिसांच्या बंदोबस्तात अतिक्रमणांवर महापालिकेकडून कारवाई

107

पुण्यातील नवले पुलाजवळ रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर प्रशासनाला जाग आली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने अखेर या परिसरातील अतिक्रमणावर कारवाई केली आहे. आज, मंगळवारी सकाळीच तब्बल १०० पोलिसांच्या बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

(हेही वाचा – Twitter युजर्ससाठी आनंदाची बातमी! ब्लू टिक सब्सक्रिप्शनचा निर्णय लांबणीवर; वेगळ्या रंगाची टिक मिळणार?)

पुण्यातील कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल या परिसरात रविवारी रात्री झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात १० जणांहून गंभीर जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. तर साधारण ४० वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेत तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. या आदेशानंतर पोलीस, महापालिका, रस्ते विकास महामंडळ यांच्या पथकाने सोमवारी घटना स्थळाची पाहणी करून तत्काळ करण्याच्या उपाययोजना सुचविल्या होत्या.

सातत्याने होणाऱ्या अपघातासंदर्भात विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावले होते. यानंतर आज, मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नवले पुल परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यास सुरूवात केली. त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महापालिका अतिक्रमण विभाग पोलीस बंदोबस्त तसेच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे साधारण १०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर होते आणि यावेळी त्यांच्याकडून कारवाईचा बडगा उगारला गेला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.