पुणे सहायक फौजदार वाजे यांची गळफास घेऊन आत्महत्या

51

मंचर पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत असलेले एकनाथ ठकाजी वाजे यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास राजगुरुनगर जवळील चांडोली येथे घडली.

हुकाला रस्सी बांधून घेतला गळफास

याबाबतच माहिती अशी की, आदित्य रवींद्र गभाले यांची पत्नी सुप्रिया या सोमवारी माहेरी चांडोली येथे आई- वडिलांकडे गेल्या होत्या. आदित्या यांची पत्नी सुप्रिया हिने त्यांना फोन करुन वडील दरवाजा वाजवूनही दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास फ्लॅटचा दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले असता एकनाथ वाजे यांनी बेडरुममधील हुकाला रस्सी बांधून गळफास घेतल्याचे दिसले.

( हेही वाचा Ravi Shastri B’Day Special: क्रिकेट विश्वातील एक ‘अष्टपैलू’ व्यक्तिमत्त्व )

डाॅक्टरांनी मृत घोषित केले

एकनाथ वाजे यांचा गळफास सोडून त्यांना ग्रामीण रुग्णालय चांडोली येथे नेले असता, डाॅक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. वाजे यांच्या आत्महत्येचे कारण समजले नसून याबाबत खेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.