मोहदरी घाटात धावत्या बसने घेतला पेट…वाचा बर्निंग बसचा थरार

65

मोहदरी घाटात नाशिकहून कोल्हापूरला जाणाऱ्या खाजगी बसने पेट घेतल्याची घटना बुधवारी १३ मे रात्री ९.३० च्या सुमारास घडली.

( हेही वाचा : मध्य रेल्वेमध्ये नव्याने सुरु झालेल्या 12 एसी लोकलचे वेळापत्रक )

बस जळून खाक

नाशिक वरुन कोल्हापूरला जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स ( एम. एच. 09/ सी. व्ही. 3070) ही मोहदरी घाटाच्या सुरुवातीला आली असता अचानक या बसच्या इंजिनने पेट घेतला. काही कळण्याच्या आत आगीने रौद्ररूप धारण केले. चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला घेतली. बस स्लिपर कोच असल्याने अनेक प्रवासी झोपलेले होते. अशात हवेच्या वेगामुळे बसची पुढील बाजू पूर्णपणे आगीने वेढली गेली. त्यामुळे चालकासह बसमधील 30 ते 35 प्रवाशांची धांदल उडाली. पुढील बाजूस मोठ्या प्रमाणावर आग लागक्याने बसमधील प्रवाशांना बसच्या पाठीमागील बाजूस असलेल्या आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले.

हवेमुळे काही क्षणातच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांचा जीव वाचला. मात्र, आगीत अनेक प्रवाशांचे साहित्य जळून खाक झाले. बसमधील खिडक्यांचे पडदे, कुशन्सनेही पेट घेतल्याने पूर्ण बस जळून खाक झाली. आगीची माहिती कळताच एमआयडीसी व नगर परिषदेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आली. बसने पेट घेतल्यानंतर मोहदरी घाटात दुतर्फा वाहतुकीची कोंडी झाली होती. एमआयडीसी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी दूर करण्याचे मदत कार्य केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.