Lok Sabha Election 2024 : मतदानाचा घसरलेला टक्का आणि मतदानाला विलंब यामागील काय आहे कारण, जाणून घ्या…

1285
Minority Votes : अल्पसंख्यांक मतांसाठी महायुती सरकारकडून ‘मार्टी’ ची स्थापना

लोकसभा निवडणुकीत पाचव्या टप्प्यात १३ लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या कामकाजावरच प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. मतदान केंद्रांवर मतदानासाठी झालेला विलंब आणि मतदान केंद्रांवरील असुविधा याबाबत सर्वच स्तरातून टिकेची झोड उठवली जात आहे. मात्र मतदान केंद्रातील असुविधा हा निवडणूक आयोगाच्या ढिसाळ व्यवस्थापनाचा भाग ठरला असला तरी प्रत्यक्षात मतदानासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा आणि होणारा विलंब यामागे अनेक कारणे समोर येत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील या तक्रारींची गंभीर दखल घेत आगामी विधानसभा निवडणुकीत अशाप्रकारच्या समस्या निर्माण होणार नाहीत यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (Lok Sabha Election 2024)

मुंबई महानगरातील १३ लोकसभा मतदारसंघांमध्ये २० मे रोजी निवडणूक पार पडली. या सर्व लोकसभा मतदारसंघातील २४, ५७९ मतदान केंद्रांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली. तब्बल २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. यासाठी २४, ५७९ कंट्रोल युनिट आणि २४ हजार ५७९ व्हीव्ही पॅडचा वापर करण्यात आला होता. मात्र, सोमवारी सकाळी सात वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही ठिकाणी १५ ते २५ मिनिटे उशिराने मतदानाला सुरुवात झाली, त्यामुळे सकाळी मतदान केंद्रावर गर्दी जमा झाली होती आणि त्यामुळे मतदारांना रांगेत तासनतास उभे राहावे लागले होते. अशाच प्रकारे पवई, शीव कोळीवाडा, माटुंगा पश्चिम, दहिसर, बोरीवली, मागाठाणे, विक्रोळी आदी भागांमधून मतदान केंद्राबाहेर गर्दी दिसून येत होती. परिणामी मतदारांना अधिक तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने मतदान केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामांबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती. (Lok Sabha Election 2024)

मतदान प्रक्रिया धिम्या गतीने होत असल्याने प्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तक्रार केली. त्यानंतर उत्तर मुंबईचे उमेदवार पियूष गोयल यांनी नाराजी व्यक्त केली होती, तर त्यानंतर उबाठा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आयोगाच्या कामकाजावर शंका उपस्थित केली. त्यामुळे मतदान प्रक्रियेतील या लांबच लांब रांगा आणि त्यामुळे मतदानाला होणार विलंब याची कारणे ‘हिंदुस्थान पोस्ट’ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या विलंबामुळे मतदानाचा टक्का घसरला असेही बोलले जात असले तरी त्यांचे निश्चित कारण समोर येत आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : दिल्लीत उष्णतेची लाट; मतदानावर परिणाम होण्याची शक्यता)

मतदानाला झालेला विलंब आणि घसरलेला टक्का याबाबतची प्रमुख कारणे
  • मतदानाकरता रविवार सुट्टीच्या दिवसा ऐवजी सोमवारच्या दिवसाची निवड करणे.
  • मतदान केंद्रावर मोबाईल फोन आणण्यास बंदी, त्यामुळे सोबत असलेल्या एका माणसाला बाहेर ठेवून एक व्यक्ती मतदान करायला जायची आणि आतील व्यक्ती बाहेर आल्यानंतर दुसरी व्यक्ती मतदान करायला जायची. यामुळे केंद्राबाहेर गर्दी दिसून येत होती.
  • या मतदान करणाऱ्या मतदारास ओळखपत्र म्हणून मतदान कार्ड किंवा आधार कार्ड याची प्रत जवळ ठेवणे बंधनकारक होते. पण बऱ्याच जणांनी मोबाईलवर आधार कार्ड दाखवण्याचा प्रयत्न केला, पण ते स्वीकारले न गेल्यामुळे हार्ड कॉपीच असणे आवश्यक होते. त्यामुळे मतदारांना ओळखपत्र आणण्यास सांगितले जात होते, परिणामी मतदान केंद्रावर गर्दी वाढत जात होती.
  • मतदान केंद्रावर आधार कार्ड, मतदान कार्ड हे तपासूनच आतमध्ये सोडले जात होते. परिणामी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर गर्दी होण्याऐवजी मतदान केंद्राच्या बाहेर गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत होते.
  • मतदान केंद्रावर सकाळी आणि संध्याकाळीच या प्रमाणात गर्दी झाली होती. पण दुपारच्या वेळेत अगदी कमी होती. सार्वजनिक सुट्टी नसल्याने तथा केवळ काही तासांची सवलत असल्याने मतदार हे सकाळी साडेअकराच्या आतमध्ये आणि दुपारी चार नंतर मतदानासाठी बाहेर पडले. पण दुपारच्या वेळेत बहुतांशी मतदान केंद्र ओस पडली होती, हाताच्या बोटावर मोजण्याइतपत मतदानासाठी मतदार केंद्राबाहेर दिसत होते.
  • मतदानाची तारीख २० मे रोजी घेतल्याने बहुतांशी कुटुंब गावी तसेच सुट्टी निमित्त बाहेर गावी गेल्याने मतदान कमी होण्याचे एक कारण आहे. (Lok Sabha Election 2024)
मतदानासाठी आयोगाने काय काळजी घ्यायला हवी 
  • बंदिस्त मतदान केंद्राची निवड करताना त्यात पुरेशी आणि खेळती हवा आवश्यक आहे.
  • शालेय इमारती तसेच हॉलचा वापर केला जाणार असेल तर ते वातानुकुलित यंत्रणा चालू ठेवण्याची तजवीज करावी.
  • प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक विशेष समन्वय नेमून त्याठिकाणच्या सुविधांसह चहा नाश्ता, पाणी भोजनाची व्यवस्था त्याकडे असेल.
  • एक हजारच्या वर मतदारांची संख्या असेल तर त्या मतदान केंद्रात मतदारांना उभे राहण्यास चांगली मोकळी जागा असेल असे पाहावे.
  • एक हजारांच्यावर मतदार असेल तर त्याठिकाणी जास्तीत जास्त पंख्यांची व्यवस्था करावी. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.