विमान 37 हजार फूट हवेत असताना वैमानिकांना लागली झोप, आणि…

93

विमानाचे सारथी असलेले वैमानिक हे डोळ्यात तेल घालून विमानाचे उड्डाण करत असतात. वैमानिकांवर फार मोठी जबाबदारी असते. पण इथिओपियामध्ये मात्र एक अजबच घटना घडली आहे. येथून निघालेल्या एका विमानातील दोन्ही वैमानिकांना विमान हवेत असतानाच झोप लागल्याची घटना समोर झाली आहे.

काय झाले नेमके?

15 ऑगस्ट रोजी इथिओपियाहून अदिस अबाबाला जाणा-या ET-343 हे विमान 37 हजार फुटांवर असताना विमानातील दोन्ही वैमानिकांचा डोळा लागला. यावेळी हे विमान ऑटो पायलट मोडवर उडत होते. ठरलेल्या रनवेवर हे विमान न उतरल्याने एअर ट्रॅफिक कंट्रोलने कॉकपीटशी संपर्क साधला असता वैमानिकांकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे काहीतरी गडबड असल्याचे समोर आले. विमानातील ऑटो पायलट मोड डिस्कनेक्ट झाल्यानंतर विमानात मोठ्या आवाजात अलार्म वाजायला सुरुवात झाली.

(हेही वाचाः आधार कार्डवर मिळणार 5 लाखांचं कर्ज, सरकारने स्पष्ट सांगितलं)

अखेर विमान रनवेवर

या अलार्मच्या आवाजाने वैमानिक खडबडून जागे झाले. त्यानंतर या वैमानिकांनी सुरक्षितरित्या विमान रनवेवर उतरवले. त्यामुळे सुदैवाने मोठा धोका टळला असून सुदैवाने प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. एविएशन एक्सपर्ट एलेक्स मॅक्रेस यांनी ट्वीट करत या घटनेबाबतची माहिती दिली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.