Delhi Republic Day Parade : कर्तव्यपथावरील पथसंचलनात नारीशक्तीचे अभूतपूर्व शौर्यदर्शन 

delhi republic day parade : आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स या तीनही दलांतील महिलांच्या तुकडीने प्रथमच परेडमध्ये सहभाग घेतला. या परेडचे नेतृत्व लष्करी पोलिसांच्या कॅप्टन संध्या यादव यांनी केले.

224
Delhi Republic Day Parade : कर्तव्यपथावरील पथसंचलनात नारीशक्तीचे अभूतपूर्व शौर्यदर्शन 
Delhi Republic Day Parade : कर्तव्यपथावरील पथसंचलनात नारीशक्तीचे अभूतपूर्व शौर्यदर्शन 

वंदना बर्वे

भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर (Kartavya Path) महिला सैनिकांनी धाडसी पथसंचलनानंतर उपस्थितांचे डोळे अभिमानाने पाणावले.

देश 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. कर्तव्यपथावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिरंगा फडकवला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी २१ तोफांची सलामीही देण्यात आली. (Delhi Republic Day Parade)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आणि त्यांचे फ्रान्सचे समकक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे स्वागत केले. राष्ट्रपती मुर्मू आणि प्रमुख पाहुणे पारंपरिक बग्गीमध्ये कर्तव्य पथावर पोहोचले. येथे त्यांनी जनतेचे अभिवादन स्वीकारले. या वेळी पीएम मोदींनी मॅक्रॉन यांना मिठी मारली आणि दोघेही काही वेळ बोलतांना दिसले.

(हेही वाचा – Ramesh Bais : आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देण्याची राज्यपालांची विद्यापीठांना सूचना)

‘आवाहन’ ग्रुपने भारतीय वाद्य वादनाच्या साथीने 90 मिनिटांच्या या परेडला सुरुवात केली. ‘आवाहन’ हा समूह आकर्षणाचा केंद्रबिंदू होता, ज्यामध्ये 100 हून अधिक महिला कलाकारांनी विविध तालवाद्ये वाजवून सहभाग घेतला. प्रथमच परेडमध्ये सहभागी झालेल्या या ग्रुपमध्ये देशाच्या विविध भागांतील भारतीय वाद्य वादनाचे आवाज ऐकू आले.

घोडदळ रेजिमेंटने केले परेडचे नेतृत्व 

जगातील एकमेव घोडदळ रेजिमेंटने प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे नेतृत्व केले. (Parade of Pride) लष्कराच्या 61 व्या घोडदळ पथकाचे नेतृत्व मेजर यशदीप अहलावत यांनी केले. 61 घोडदळ 1953 मध्ये स्थापन झाली होती. जगातील सर्व ‘स्टेट हॉर्स्ड कॅव्हलरी युनिट्स’चा समावेश असलेले हे एकमेव सेवा देणारे सक्रिय घोडदळ पथक आहे.

महत्त्वाचे म्हणजे, आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स या तीनही दलांतील महिलांच्या तुकडीने प्रथमच परेडमध्ये सहभाग घेतला. या परेडचे नेतृत्व लष्करी पोलिसांच्या कॅप्टन संध्या यादव यांनी केले.

केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील महिला कर्मचाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ‘नारी शक्ती’ कौशल्याचे प्रदर्शन केले. मोटारसायकल चालवणाऱ्या 265 महिला दुचाकीस्वारांनी शौर्य आणि पराक्रमाचे शिखर गाठले.

एकूण 16 चित्ररथ

या वेळी परेडमध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे एकूण 16 चित्ररथ होते, तर केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या नऊ झलकांनीही सहभाग घेतला होता, परंतु सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशच्या झांकीवर खिळल्या होत्या, कारण उत्तर प्रदेशच्या चित्रारथाच्या समोर प्रभु श्रीराम यांची मूर्ती होती. हा चित्ररथ विकसित भारताच्या समृद्ध वारशावर आधारित होता.

आकाशात धुके असताना, 11 यांत्रिक स्तंभ, 12 मार्चिंग सैन्य आणि आर्मी एव्हिएशन कॉर्प्सच्या प्रगत हलक्या हेलिकॉप्टरने सलामी दिली. हवाई दलाच्या 46 विमानांनी फ्लाय-पास्ट करून परेडची सांगता झाली. या काळात मिग २९, अपाचे, प्रचंड, डकोटा, राफेल आदी विमानांनी आकाशात शौर्यदर्शन घडवले. (Delhi Republic Day Parade)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.