Pandit Madan Mohan Malviya : ’सत्यमेव जयते’ला लोकप्रिय बनवणारे पंडित मदन मोहन मालवीय जीवन परिचय

317
Pandit Madan Mohan Malviya : ’सत्यमेव जयते’ला लोकप्रिय बनवणारे पंडित मदन मोहन मालवीय जीवन परिचय
Pandit Madan Mohan Malviya : ’सत्यमेव जयते’ला लोकप्रिय बनवणारे पंडित मदन मोहन मालवीय जीवन परिचय

मदन मोहन मालवीय (Pandit Madan Mohan Malviya) हे काशी हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होते. पत्रकारिता, वकिली, समाजसुधारणा, मातृभाषा आणि भारत मातेच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या या महामानवाने स्थापन केलेल्या विद्यापीठात विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन देशसेवेसाठी तयार करणे हे त्यांचे ध्येय होते.

पंडित मदन मोहन मालवीय (Pandit Madan Mohan Malviya) यांचा जन्म २५ डिसेंबर १८६१ रोजी अलाहाबाद (आता प्रयागराज), उत्तर प्रदेश येथे झाला. ते एक उत्तम शिक्षणतज्ज्ञ, उत्कृष्ट वक्ते आणि प्रसिद्ध राष्ट्रीय नेते होते. त्यांनी स्वातंत्र्य चळवळींमध्ये भाग घेतला, उद्योगांना चालना दिली, देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात योगदान दिले. त्यांच्या सर्वोच्च त्यागासाठी महात्मा गांधींनी त्यांना ‘महामान’ ही पदवी दिली होती.

(हेही वाचा-Vitthal-Rukmini Mandir: पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून दागिने गहाळ, ३१५ दागिन्यांची नोंद नसल्याचे उघडकीस)

मालवीय यांनी शिक्षण, धर्म, समाजसेवा, हिंदी भाषेचा विकास आणि राष्ट्रीय महत्त्वाशी संबंधित इतर अनेक कार्ये केली. त्यामुळेच भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. एस. राधाकृष्णन यांनी त्यांना ‘कर्मयोगी’ म्हटले. मालवीय हे जहालही नव्हते आणि मवाळही नव्हते. त्यांनी मध्यम मार्ग पत्करला. १९३० मध्ये महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली तेव्हा त्यांनी त्यात सक्रिय सहभाग घेतला आणि त्यांना अटकही झाली.

पंडितजी १९०९, १९१८, १९३२ आणि १९३३ मध्ये ते एकूण चार वेळा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. १९१५ मध्ये हिंदू महासभेच्या स्थापनेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. हरिद्वारच्या भीमगोडा येथे गंगेच्या प्रवाहावर परिणाम करणाऱ्या ब्रिटिश सरकारच्या धोरणांमुळे घाबरलेल्या मालवीयजींनी १९०५ मध्ये गंगा महासभेची स्थापना केली होती. ‘सत्यमेव जयते’ ही संज्ञा त्यांनी लोकप्रिय केली.

२०१४ मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. २०१६ मध्ये भारतीय रेल्वेने मालवीय यांच्या सन्मानार्थ वाराणसी-नवी दिल्ली ‘महामना एक्सप्रेस’ सुरू केली. १२ नोव्हेंबर १९४६ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.