दहशतवादाचा अड्डा बनलाय पाकिस्तान, तरीही भारताच्या नावाने करतोय अपप्रचार

100

इस्लामिक देशांसोबत भारताचे संबंध सुधारत आहेत, हे पाकिस्तानच्या पचनी पडत नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विविध देशांनी ६ वेळा सर्वोच्च सन्मान केला आहे. ही बाब शेजारील देश पाकिस्तानच्या डोळ्यांत खुपत आहे. म्हणूनच पाकिस्तानी सरकार, गुप्तचर संघटना आयएसआय आणि त्याचे एजंट भारताच्या विरोधात कायम द्वेष भावना प्रकट करत असतात. पाकिस्तान हा दहशतवाद्यांचे आश्रयस्थळ बनले आहे, म्हणून जागतिक एजेन्सी एफएटीएफ (फायनान्शीअल एक्शन टास्क फोर्स)ने पाकिस्तानला काही वर्षे ‘ग्रे’  यादीत टाकले होते. असे असूनही पाकिस्तान जेव्हा भारताचा दहशतवादी देश म्हणून अपप्रचार करतो, तेव्हा आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भारताचे मुस्लिम देशांशी संबंध चांगले आहेत. यामध्ये इस्लामी सहयोगी संघटना (ओआईसी)च्या ५६ देशांचा सहभाग आहे. ज्यांनी पाकिस्तानला बाजूला करून वर्ष २०१९ मध्ये भारताला गेस्ट ऑफ ऑनर बनवले. या दरम्यान भारताचे कतार आणि संयुक्त अरब यांसारख्या कट्टर इस्लामी देशांशी संबंध सुधारले. कतारसोबत संबंध सुधारल्यामुळे पाकिस्तानचा तीळपापड झाला. त्यामुळे पाकिस्तानच्या सरकारी यंत्रणेशी जोडलेली प्रसारमाध्यमे यांनी कतारला इस्लामिक ब्रॅदर्ली कंट्री च्या रूपाने संबोधित केले आहे. यातून स्पष्ट होते की, कतार आणि भारत यांच्यातील घनिष्ट संबंधांवर इस्लामी ब्रदरहूडच्या नावाखाली भारतावर दहशतवाद आणि इस्लामी देशात हेरगिरी करत असल्याचा आरोप पाकिस्तान करत आहे. यासंबंधीचे ताजे उदाहरण आहे, कतारमधील खासगी कंपनीत कार्यरत आठ भारतीयांची अटक! हे सर्व जण कतारच्या डिफेन्स इस्टॅब्लिशमेंटच्या सुरक्षा व्यवस्थेशी संलग्न कंपनीशी जोडले होते. त्यांना अटक केली गेल्याची बातमी जेव्हा सोशल मीडियात व्हायरल झाली, तेव्हा पाकिस्तानने या विषयाचा आधार घेत खोटा प्रचार करण्यात सुरुवात केली.

भारत आणि कतार यांच्यात घनिष्ट संबंध

कतारसोबत भारताचे संबंध दृढ बनले आहेत. राजनैतिक, रणनीती, संरक्षण, व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंधांचा यात समावेश आहे. कतारच्या संरक्षण क्षेत्रातील घटकांना भारतातील तज्ज्ञ प्रशिक्षण देतात. भारत, दोहा इंटरनॅशनल मेरीटाईम डिफेन्स एक्झिब्युशन अँड कॉन्फरन्स (डीआईएमडीईएक्स) मध्ये सहभाग घेतला होता. भारतीय नौसेना आणि कोस्ट गार्डचे लढाऊ विमान कातरकडे नियमित जातात. नोव्हेंबर २००८मध्ये भारताचे पंतप्रधान जेव्हा कतारच्या दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी ‘इंडिया कतार डिफेन्स कोऑपरेशन ऍग्रीमेंट’ वर हस्ताक्षर केले होते. २०१८मध्ये ५ वर्षांपर्यंत हा करार वाढवला. हा करार लागू करण्यासाठी दोन्ही देशांनी ‘जॉइंट डिफेंस को-ऑपरेशन कमिटी’ (जेडीसीसी)ची स्थापना केली होती.

(हेही वाचा पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार, खान गंभीररित्या जखमी)

दोन्ही देशांमध्ये राजकीय पातळीवर घनिष्ट संबंध आहेत. भारत कतारकडून (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस), केमिकल, पेट्रोकेमिकल, प्लास्टिक, ऍल्युमिनियम आणि लोखंडाची मोठ्या प्रमाणात आयात करते.

पाकिस्तानचे अपप्रचाराचे तंत्र

भारताचे इस्लामी देशांशी चांगले संबंध आहेत. हे पाकिस्तानला खटकते. म्हणून इस्लामचे कार्ड खेळून भारताच्या विरोधात अपप्रचार करत हे संबंध बिघडवण्याचा पाकिस्तान प्रयत्न करत असतो. कतारसोबत संरक्षण क्षेत्रातील करारानंतर जे आठ भारतीय अधिकारी यांना अटक करण्यात आली आहे, हे प्रकरण दोन्ही देशांमधील आहे. असे असतानाही पाकिस्तान मात्र या प्रकरणाकडे संधी म्हणून पाहत आहे. त्यानुसार पाकिस्तानची सरकारी यंत्रणा, आयएसआयच्या पे रोलवर असलेले प्रचार तंत्र आणि पाकिस्तानी माध्यमे यांच्याकडून आठ भारतीय सेवानिवृत्त नौसैनिक अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे, असे प्रस्तुत करण्यात येत आहे. यामाध्यमातून पाकिस्तान भारताला दहशतवादाशी संबंधित असल्याचे सिद्ध करत आहे. वस्तुतः इतिहास साक्षी आहे की, जगभरात एकाही दहशतवादी संघटनेशी भारताचा संबंध नाही.

कतारची घटना

कतार एमीरी नौसेनेला प्रशिक्षण देणाऱ्या भारतीय नौसेनेच्या आठ माजी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. याची माहिती एका सोशल मीडियाच्या साईटवर एक महिला डॉ. मीतू भार्गवने केलेल्या पोस्टवरून समोर आली. याचेच साहाय्य घेत पाकिस्तानी एजेन्सींनी भारताला लक्ष्य करणे सुरु केले आहे. डॉ. मीतू लिहितात की, सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना बेकायदेशीररीत्या मागील ५७ दिवसांपासून दोहा येथे अटकेत ठेवण्यात आले आहे. या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना टॅग केले.

ज्या अधिकाऱ्यांची माहिती या ट्विटमध्ये देण्यात आली आहे, ते दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजी अँड कन्सल्टन्सीसाठी काम करत होते. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजी कतार डिफेन्स, स्थानिक सुरक्षा आणि सरकार यांचा संयुक्त करार झाला होता. या कंपनीचे सीईओ खमीस अल अजमी आहेत, जे रॉयल ओमान एअर फोर्सचे माजी स्क्वॉड्रन लीडर होते. या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आल्याची चर्चा आहे, त्यामध्ये भारतीय नौसेनेचे निवृत्त कमांडर पुर्णेंदु तिवारी आहेत. त्यांना वर्ष २०१९मध्ये प्रवासी भारतीय सन्मान पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. या विषयात कतारने कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नाही.

(हेही वाचा मेट्रोसिटी, लहान शहर आणि ग्रामीण भागातील महिलाही ‘मद्या’च्या आहारी)

पाकिस्तान इस्लामी दहशतवादाचा अड्डा

हा देश दीर्घकाळ दहशतवाद्यांना आश्रय देत आला आहे. भारतात सक्रिय सर्व दहशतवादी संघटनांचे केंद्र पाकिस्तानात आहेत. दक्षिण आशिया टेररिझम पोर्टलने सूचीबद्ध केलेल्या त्यापैकी काहींची नावे येथे आहेत.

  • तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)
  • हिज़्ब-उल- मुजाहिदीन (एचएम)
  • हरकत-उल- अंसार (एचयूएल, ज्यांना वर्तमानात हरकत-उल मुजाहिदीन या नावाने ओळखले जात आहे.)
  • हरकत-उल-मुजाहिदीन (एचयूएम, याच्या आधी हरकत-उल-अंसार या नावाने ओळखली जायची.)
  • अल बद्र
  • जमात-उल- मुजाहिदीन (जेयूएम)
  • लष्कर-ए-जब्बार (एलईजे)
  • हरकत-उल- जेहाद-अल-इस्लामी (हूजी)
  • मुत्ताहिदा जेहाद परिषद (एमजेसी)
  • अल बरकी
  • तहरीक-उल-मुजाहिदीन
  • जम्मू आणि काश्मीर नॅशनल लिबरेशन आर्मी
  • पीपल्स लीग
  • मुस्लिम जांबाज फोर्स
  • कश्मीर जेहाद फोर्स
  • अल जेहाद फोर्स (मुस्लिम जांबाज फोर्स आणि कश्मीर जेहाद फोर्स यांना जोडते)
  • अल उमर मुजाहिदीन
  • महज़-ए-आज़ादी
  • इस्लामी जमात-ए-तुलबा
  • जम्मू आणि कश्मीर छात्र मुक्ति मोर्चा
  • इखवान-उल- मुजाहिदीन
  • इस्लामिक स्टूडेंट्स लीग
  • तहरीक-ए-हुर्रियत-ए-कश्मीर
  • मुस्लिम मुजाहिदीन
  • अल मुजाहिद फोर्स
  • बलूच रिपब्लिकन आर्मी (बीआरए)
  • जमात-उल-अहरार (जेयूए)
  • लष्कर-ए-इस्लाम (एलआई)
  • हक्कानी नेटवर्क (एचएन)
  • बलूचिस्तान लिबरेशन फ्रंट (बीएलएफ)
  • हिज़्ब-उत-तहरीर (एचयूटी)
  • तारिक गिदर ग्रुप (टीजीजी)
  • जमात-उल-दावा अल-कुरान (जेडीक्यू)
  • यूनाइटेड बलूच आर्मी (यूबीए)
  • बलूच लिबरेशन आर्मी (बीएलए)
  • तंजीम-उल-इस्लामी-उल-फुरकान (टीआईएफ)
  • तालिबान
  • बलूच रिपब्लिकन गार्ड्स (बीआरजी)
  • बलूच लिबरेशन यूनाइटेड फ्रंट (बीएलयूएफ)
  • हक्कानी नेटवर्क (एचएन)
  • हिज़्ब-उत-तहरीर (एचयूटी)
  • लष्कर-ए-जब्बार (एलईजे)
  • सिंधुदेश लिबरेशन आर्मी (एसएलए)
  • सुन्नी तहरीक (एसटी)

पाकिस्तान हा या दहशतवादी संघटनांचा आश्रयस्थान आहे, तर भारत हा शांतताप्रिय देश आहे, जिथे दहशतवादाबाबत शून्य सहनशीलता धोरण आहे. भारत दहशतवाद सहन करत नाही आणि दहशतवादाला खतपाणी घालत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.