Ranjit Savarkar : अमरावतीत सावरकरी विचारांचा जागर; रणजित सावरकरांच्या उपस्थितीत भव्य रॅली

९३७, १९३९ आणि १९४३ मध्ये वीर सावरकरांनी अमरावतीचा दौरा केला होता. अमरावतीत स्वातंत्र्य चळवळीची रुजवात सावरकरांनी केली.

134
अमरावतीत सावरकरी विचारांचा जागर; रणजित सावरकरांच्या उपस्थितीत भव्य रॅली
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अमरावतीचे विशेष नाते आहे. येथे स्वातंत्र्य चळवळीची रुजवात सावरकरांनी केली. या आठवणीप्रित्यर्थ गुरुवारी, ३१ ऑगस्टला अमरावतीत सावरकरी विचारांचा जागर करण्यात आला. तसेच वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांच्या उपस्थितीत परतवाड्यात भव्य रॅली काढण्यात आली.
१९३७, १९३९ आणि १९४३ मध्ये वीर सावरकरांनी अमरावतीचा दौरा केला होता. अमरावतीत स्वातंत्र्य चळवळीची रुजवात सावरकरांनी केली. येथील स्वातंत्र्यसैनिक डॉ. गणेश पिंपरकर यांना सोबत घेऊन त्यांनी स्थानिकांना स्वातंत्र्य लढ्याविषयी जागरूक केले. त्यामुळे सावरकरांच्या आठवणी येथील नागरिकांनी आजही जतन करून ठेवल्या आहेत.
सावरकरांचा हा अनमोल ठेवा त्यांच्या वारसांना सुपूर्द करण्यासाठी अमरावतीकरांनी त्यांचे नातू रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांना निमंत्रित केले. त्याला मान देऊन ३० ऑगस्टला रणजित सावरकर अमरावतीत दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागताला स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी अमरावतीमध्ये भव्य रॅली काढून सावरकरांच्या आठवणींचा जागर करण्यात आला.

खापर्डे वाड्याला भेट

लोकमान्य टिळकांचे वकील दादासाहेब खापर्डे यांच्या अमरावतीमधील वाड्याला रणजित सावरकर यांनी भेट दिली. दादासाहेब आणि वीर सावरकर यांचे घनिष्ठ संबंध होते. अमरावती दौऱ्यावर असताना सावरकर येथे थांबले होते. या वाड्यालगत असलेल्या विहिरीत सावरकर पोहायचे. लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, शेगावचे गजानन महाराज आदींनी या वास्तूला भेट दिली होती, अशी आठवण खापर्डे यांचे नातू दिनेश यांनी सांगितली. आता हा वाडा पडक्या अवस्थेत असून, विहिरीचीही दुरवस्था झाली आहे. पुरातत्व विभागाने तो ताब्यात घेऊन या ठिकाणी संग्रहालय उभारावे, अशी मागणी त्यांनी केली.

वीर सावरकरांची छत्री

अमरावतीत स्वातंत्र्य चळवळीची रुजवात सावरकरांनी केली. येथील स्वातंत्र्यसैनिक डॉ. गणेश पिंपरकर यांना सोबत घेऊन त्यांनी स्थानिकांना स्वातंत्र्य लढ्याविषयी जागरूक केले. रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी पिंपरकर यांच्या घरी जात त्यांच्या वारसांची भेट घेतली. डॉ. गणेश पिंपरकर यांचे सुपुत्र अनंत यांनी सावरकरांशी संबंधित अनेक वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. त्यात सावरकरांच्या छत्रीचा समावेश आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रीच्या दांड्यामध्ये गुप्ती छुप्या पद्धतीने बसविण्यात आली आहे. शिवाय वीर सावरकर ज्या बाकड्यावर बसले होते, तो बाकडाही पिंपरकर कुटुंबियांनी आत्मीयतेने जतन करून ठेवला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.