Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त शिवकालीन शस्त्रांचे गोरेगावमध्ये प्रदर्शन

महाराजांच्या अफाट शौर्याचे कुतूहल, त्यांचे किल्ले, त्यांच्या कथा आपण वाचत्तो, ऐकतो. मात्र त्यांनी त्या काळात वापरलेल्या शस्त्रांचा साठा, मोगलांशी दोन हात करताना भल्या मोठ्या फौजांना शह देण्यासाठी वापरलेली शस्त्रे आपल्याला प्रत्यक्ष पाहण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे.

246
Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त शिवकालीन शस्त्रांचे गोरेगावमध्ये प्रदर्शन

मुंबई, ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’, गोरेगाव तालुका व ‘पार्वतीबाई शंकरराव चव्हाण ट्रस्ट’च्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची जयंती (Shiv Jayanti 2024) १९ फेब्रुवारी रोजी आहे. त्या निमित्ताने दिनांक १६ व १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:०० ते रात्री १० वाजेपर्यंत २ दिवसांचे ‘शिवकालीन शस्त्र प्रदर्शन’ आयोजितकरण्यात येणार आहे. देशाला व जगाला आदर्श देणारा राजा ही शिवराजाची ख्याती आहे. (Shiv Jayanti 2024)

महाराजांच्या अफाट शौर्याचे कुतूहल, त्यांचे किल्ले, त्यांच्या कथा आपण वाचत्तो, ऐकतो. मात्र त्यांनी त्या काळात वापरलेल्या शस्त्रांचा साठा, मोगलांशी दोन हात करताना भल्या मोठ्या फौजांना शह देण्यासाठी वापरलेली शस्त्रे आपल्याला प्रत्यक्ष पाहण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. शिवरायांचं जतन केलेले हे वैभव ह्या प्रदर्शनाचा माध्यमातून पाहत येईल. विशेषकरून त्याचा लाभ शालेय व कॉलेजचे विद्यार्थी, नव तरुण वर्ग तसेच शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत त्या काळातील दुर्मिळ शस्त्रे पाहण्याची नामी संधी उपलब्ध होणार आहे. (Shiv Jayanti 2024)

(हेही वाचा – Water Cut : पश्चिम उपनगरातील ‘या’ भागात शुक्रवार आणि शनिवारी येणार कमी दाबाने पाणी)

या प्रदर्शनात दुर्मिळ भाले, तलवारी, कट्यार, खंजिर, चिलखत, दारू गोळे, ढाल, पट्टे, वाघ नखं, बिचवे आशा विविध प्रकारचे दुर्मिळ शस्त्रे या प्रदर्शनात पहायला मिळतील. प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य आहे. आजच्या २१ व्या डिजिटल युगात, संघर्ष व लढाया करुन रयतेचे राज्य प्रस्तापित करणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे जनक राजे शिवराय ह्यांचे स्मरण ह्या निमित्ताने करुन शिवजयंती (Shiv Jayanti 2024) साजरी करावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९८२०२५१४५५ (Shiv Jayanti 2024)

कधी होणार प्रदर्शन 

दिनांक : १६ व १७ फेब्रुवारी २०२४
वेळ : सकाळी १० ते रात्री १०
स्थळ : गोविंद दळवी सभागृह, अंबामाता मंदिर समोर, अ. भि. गोरेगावकर शाळेजवळ, गोरेगांव पश्चिम, मुंबई. (Shiv Jayanti 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.