Elephanta Caves : घारापुरी येथे हिंदुत्वनिष्ठांनी केली शिवलिंगाची पूजा

Elephanta Caves : सुदर्शन वृत्तवाहिनीसह स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वनिष्ठांनी प्रातिनिधीक पूजा केली.

185
Elephanta Caves : घारापुरी येथे हिंदुत्वनिष्ठांनी केली शिवलिंगाची पूजा
Elephanta Caves : घारापुरी येथे हिंदुत्वनिष्ठांनी केली शिवलिंगाची पूजा

युनोस्कोने (संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था) जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेली घारापुरी लेणी हे भगवान शिवाचे प्राचीन स्थान आहे. हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा आणि धार्मिक स्थान असलेल्या घारापुरी येथे हिंदूंना पूजेचा अधिकार मिळावा, यासाठी हिंदूंनी जनआंदोलन केले. सुदर्शन वाहिनीच्या (Sudarshan News) पुढाकाराने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ (Hindu Janajagruti Samiti) यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंनी घारापुरी (Gharapuri Caves) येथील शिवपिंडीची प्रातिनिधीक पूजाअर्चा केली. (Elephanta Caves)

New Project 2024 02 15T211116.272

या वेळी सुदर्शन वाहिनीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी या जनआंदोलनाचे नेतृत्व केले. या पूजाविधीसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी घारापुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बळिराम ठाकूर हेही उपस्थित होते.

(हेही वाचा – BMC : मुंबईकरांना आणखी तीन तरण तलावात लुटता येणार पोहण्याचा आनंद; येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये होणार लोकार्पण)

मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे सकाळी १०.३० वाजता एकत्र येऊन सर्व धर्मप्रेमी बोटीने घारापुरी येथे गेले. जातांना हातात भगवे ध्वज घेऊन ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणा देत हिंदूंनी घारापुरी येथील शिवमंदिरात प्रवेश केला. येथील शिवपिंडीला गंगेच्या जलाने अभिषेक करून पुष्प अर्पण करून सामूहिक आरती केली. या ठिकाणी शिवस्तोत्राचे पठण करून हिंदूंनी ‘हर हर महादेव’चा जयघोष केला. या वेळी उपस्थित सर्व हिंदूंमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

ब्रिटिशांच्या काळात शिल्पांवर गोळीबारीचा सराव

घारापुरी बेट हे रायगड जिह्यातील उरण तालुक्यात आहे. घारापुरी येथील लेणी ६-८ व्या शतकाची असल्याचे मानले जाते. याचे वैशिष्ट्य म्हणजे भव्य अशा शिलेमध्ये गुफा निर्माण करून त्यामध्ये भगवान शिवाचे विविध कथांमधील प्रसंगांची शिल्पे या दगडावर साकारण्यात आली आहेत. ही सर्व शिल्पे भव्य आहेत. ही शिल्पे म्हणजे भारतीय शिल्पकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना मानला जातो. येथे ५ गुफांचा समूह असून या सर्व गुंफांमध्ये शैवलेणी कोरण्यात आली आहेत. पोर्तुगिजांच्या काळात या शिल्पांची तोडफोड केली गेली. ब्रिटिशांच्या काळात या शिल्पांवर गोळीबारीचा सराव करण्यात आला. त्यामुळे सद्यस्थितीत येथील बहुतांश शिल्पे भग्न झाली आहेत. ही लेणी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असून येथील शिवपिंडीची पूजाअर्चा बंद आहे.

धार्मिक स्थळी पूजेचा अधिकार नसणे हा हिंदूंवरील अन्याय ! – रमेश शिंदे

केंद्रीय संसद समितीच्या अहवालानुसार पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असलेल्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पूजा करण्याची अनुमती देण्यात आली आहे. याचा अर्थ केंद्रशासनाचीही तीच इच्छा आहे. केंद्रशासनाच्या अखत्यारितील केंद्रीय पुरातत्व विभागाने जर त्यांच्या अखत्यारितील धार्मिक ठिकाणी पूजेची अनुमती दिली असेल, तर राज्यांनाही ती देण्यास काहीच हरकत नाही. कोणार्कच्या सूर्यमंदिरातही हिंदूंना पूजेचा अधिकार नाही. सूर्यदेवाची मूर्ती समोर असूनही हिंदूंना देवाची पूजा करता न येणे हा एक प्रकारचा अन्यायच होय.

हिंदूंनी आपल्या संस्कृतीचा आदर केला, तर अन्यही करतील ! – रणजित सावरकर

जीवन जगतांना संस्कृतीचा अभिमान बाळगायला हवा. घारापुरी येथील लेणी आमची संस्कृती आहे. कुणासाठी ही श्रद्धास्थाने असतील, तर कुणासाठी ही पूजास्थाने असतील. दृष्टीकोन वेगवेगळे असू शकतात; मात्र ही लेणी आमच्या पूर्वजांनी घडवली आहेत, हे सत्य आहे. त्यामुळे त्यांचा अवमान करणे कुणालाही आवडणार नाही. कुणी आपल्या घरात यायचे आणि देवघरात चपला घालून शिरायचे हे योग्य नाही. चर्चमध्ये जोडे घालून जाणे चालत असले, तरी हिंदूंच्या देवघरात चपला घालणे ही आपली संस्कृती नाही. आपण आपल्या संस्कृतीचा आदर केला, तर अन्यही करतील. घारापुरीवासियांना माझी विनंती आहे की, त्यांनी येथे येणार्‍या पर्यटकांना याविषयी सांगायला हवे. हिंदूंचा स्वाभिमान आता जागृत होत आहे. अयोध्येतील श्रीराममंदिरामुळे निर्माण झालेला विश्वास आता सर्वत्रच्या हिंदूंमध्ये निर्माण होत आहे.

पुरातत्व विभागाच्या अखत्यारितील सर्व धार्मिक स्थळी हिंदूंना पूजेचा अधिकार मिळावा ! – सुरेश चव्हाणके 

पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या मंदिरांमध्ये पूजा होत नाही; पण पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या मशिदींमध्ये नमाजपठण होते. हेच काय तर पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या हिंदूंच्या धार्मिक स्थळांमध्ये चप्पल घालून जाण्यात येते. घारापुरा येथील धार्मिक स्थळाचीही अशीच स्थिती आहे. पुरातत्व विभागाच्या अखत्यारित हिंदूंची जेवढी धार्मिक ठिकाणे आहेत, त्या ठिकाणी पूजाअर्चा चालू करण्यासाठी अनुमती मिळावी, तसेच तेथे पादत्राणे घालून प्रवेश करण्यावर बंदी घालावी, अशी आमची मागणी आहे. घारापुरी हे भगवान शंकराचे स्थान आहे. हिंदूंचे हे पूजास्थान आहे. भगवान शिवाच्या मंदिरात सोमवारी पूजा केली जाते. हे ठिकाण मात्र सोमवारी बंद केले जाते, हे जाणीवपूर्वक केले जात आहे का ?, यापुढे सोमवारी येथे प्रवेश देण्यात यावा. (Elephanta Caves)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.