‘लालपरी’ नव्या रंगात! ‘या’ मार्गावर धावणार पहिली इलेक्ट्रिक बस

154

एसटी महामंडळातील लालपरी, शिवशाही, शिवनेरी, हिरकणी, विठाई यासारख्या बसेसच्या परिवारात आता आगळी-वेगळी नवख्या रूपातील लालपरी नव्या रंगात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. राज्यात ज्या मार्गावर पहिली एसटी महामंडळाची बस धावली होती त्याच मार्गावर म्हणजे पुणे-अहमदनगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक एसटी बस धावणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून होताना दिसतेय. ‘शिवाई’ असे या बसचे नाव असणार असून या वर्षाअखेरीस 3 हजार पर्यावरणपूरक गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा- पहिली एसटी कधी आणि कुठे धावली? आपल्या लालपरीचा रंजक इतिहास!)

ई-बसेस लवकरच राज्यभरात धावणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेस लवकरच राज्यभर धावण्यास सुरुवात होणार आहे. राज्य परिवहन मंडळाची पहिली ई-बस 7 जून रोजी पुणे ते अहमदनगरला रवाना होईल, हा त्यांचा स्थापना दिवस देखील असणार आहे. राज्यात ई वाहनांचा वापर हळूहळू वाढण्यास सुरूवात झाली असताना पेट्रोल डिझेलवर मुख्यतः धावणाऱ्या महामंडळाच्या बसेसच्या ताफ्यात आता अधिकाधिक इलेक्ट्रिक बसेस बघायला मिळणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाच्या ताफ्यात सप्टेंबर 2019 मध्ये प्रथम इलेक्ट्रिक बस दाखल झाली. प्रदुषणाविना चालणाऱ्या या बस अधिक सुरक्षित आणि चांगला प्रवास अनुभव प्रवाशांना देणार असल्याचे सांगून शिवाई या इलेक्ट्रिक बसेस टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत.

पहिल्या टप्प्यात किती ई-बस समाविष्ट होणार?

पहिल्या टप्प्यात, जून-जुलैपर्यंत महामंडळाच्या ताफ्यात 150 ई-बस समाविष्ट होतील. एमएसआरटीसी केंद्र सरकारच्या फास्टर अॅकॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड अँड इलेक्ट्रिक व्हेइकट्स योजने अंतर्गत टप्याटप्याने 1,000 इलेक्ट्रिक बस आणि 2,000 CNG बसेस मिळवणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.