Mission Aditya L-1 : २ सप्टेंबर रोजी होणार लॉन्च

श्रीहरिकोटा मधील सतीश धवन केंद्रामधून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने आदित्य एल-१ मिशन लाँच होणार आहे.

96
Mission Aditya L-1 सप्टेंबर २ रोजी होणार लॉन्च
Mission Aditya L-1 सप्टेंबर २ रोजी होणार लॉन्च

इस्रोचे मिशन आदित्य एल-१ हे २ सप्टेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. श्रीहरिकोटा मधील सतीश धवन केंद्रामधून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने आदित्य एल-१ मिशन लाँच होणार आहे. चंद्रयान-३ मोहीम यशश्वीरित्या पूर्ण झाल्यामुळे आत्ता सूर्यावर जाण्याची तयारी भारताकडून करण्यात येणार आहे. सूर्यावरील आदित्य एल-१ ही मोहीम सर्वात कठीण मोहीम असणार आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले “भारताची आता सूर्यावर जाण्याची तयारी सुरु आहे.’ त्यांनी म्हटलं आहे की, ‘भारताचं मिशन आदित्य एल-१ हे सप्टेंबरमध्ये लाँच होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रयानावर इस्रोचं लक्ष होतं. पण त्याच सोबत इतर काही मोहिमांची तयारी देखील इस्रोकडून करण्यात येत होती. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी आदित्य एल-१ मिशन बद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले ‘ही भारताची पहिलीच सूर्य मोहीम असणार आहे. या सूर्य मोहिमेत भारत सूर्याचा अभ्यास करणार आहे. या मोहिमेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून आदित्य एल-१ हे यान प्रक्षेपित होणार आहे. पुढील पाच वर्ष इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे. भारताने चंद्रावर यशश्वी पाऊल ठेवल्यानंतर आत्ता सूर्यावर जाण्याची मोहीम हाती घेतली आहे. भारताच्या या मोहिमेकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचा – Chandrakant Patil : गणेशोत्सवानिमित्त देखावे साकारताना काळाचे भान ठेवा, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन)

आदित्य एल-१ हे अवकाशातील कणांचा प्रसार, हवामानाची गती, प्रदेश इत्यादी समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे व सर्व माहिती इस्रोला देईल असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. पेलोडचा सूट कोरोनल हीटिंग, कोरोनल मास इजेक्शन, प्री-फ्लेअर आणि फ्लेअरची हालचाल हे समजून घेणे सोपे होणार आहे. चंद्रयान-३च्या यशश्वी मोहिमेनंतर भारताने अनेक मोहीम हाती घेतल्या आहेत. यामधील मिशन आदित्य एल-१ हे २ सप्टेंबरला लाँच होणार आहे. इस्रोला असा विश्वास आहे की चंद्रयान-३ यशश्वी झाल्यानंतर आत्ता सूर्य मोहीम यशश्वी होईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.