Sachin Tendulkar : आमदार बच्चू कडू सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवणार

117
Sachin Tendulkar : आमदार बच्चू कडू सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवणार

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष बच्चू कडू हे लवकरच (Sachin Tendulkar) भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना कायदेशीर नोटीस पाठवणार आहेत. ऑनलाईन गेमच्या जाहिरातीप्रकरणी ही नोटीस असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.

३० ऑगस्ट रोजी नोटीस पाठवण्यात येईल

सचिनने (Sachin Tendulkar) ऑनलाईन जाहिरातीतून माघार घ्यावी, नाहीतर त्यांच्या घरासमोर आंदोलन करु, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. बच्चू कडू यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र दिलं होते. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. याबाबत बच्चू कडू यांनी सांगितलं की, आपण सचिन तेंडुलकर यांना दिलेला वेळ संपत आलेला असून वकिलाकडून नोटीस पाठवण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ३० ऑगस्ट रोजी नोटीस पाठवण्यात येईल.

(हेही वाचा – 10th, 12th Exam Date : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! दहावी – बारावी परीक्षेची तारीख ठरली)

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

बच्चू कडू पुढे म्हणाले की, दिलेल्या वेळेत सचिन (Sachin Tendulkar) यांनी अभिप्राय दिलेला नाही. त्यामुळे ३० तारखेला नोटीस दिल्यानंतर आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू. भारतरत्न असलेल्या माणसाने काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, हे ठरवावं असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

बच्चू कडू म्हणाले की, भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हे ऑनलाईन गेमबाबतची जाहिरात करतात. त्यामुळे युवा पिढी अशा खेळांकडे आकर्षित होते. पैशासाठी अशी जाहिरात करणे योग्य नाही. त्यांनी अशा जाहिराती करु नये अशी आम्ही त्यांना यापूर्वी विनंती केली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे युवा वर्ग प्रभावित होतो, असं कडू यांनी स्पष्ट केलं.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.