वरळीच्या जांबोरी मैदानात BJP उभारणार ‘परिवर्तना’ची हंडी

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात भाजप देणार आव्हान.

109
वरळीच्या जांबोरी मैदानात BJP उभारणार 'परिवर्तना'ची हंडी
वरळीच्या जांबोरी मैदानात BJP उभारणार 'परिवर्तना'ची हंडी

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात भाजप आणि शिंदेंनी विशेष लक्ष केंद्रीत केले असून, यावर्षी भाजपकडून वरळीत परिवर्तनाची दहीहंडी उभारली जाणार आहे. भाजपने तशी तयारी केली असून आशिष शेलार लवकरच यासंदर्भातील सविस्तर माहितीसह घोषणा करतील. गेल्यावर्षी देखील भाजपने जांबोरी मैदानात दहीहंडी आयोजित केली होती. यावर्षी याच मैदानात परिवर्तनाची दहीहंडी करत आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा भाजपचा प्रयत्न राहील.

(हेही वाचा – Pune Guardian Minister : पुण्यात चंद्रकांत पाटलांसमोर अजित पवारांचे आव्हान)

याआधी मराठी दांडिया, मराठमोळी दिवाळी पहाट नंतर आता भाजपची परिवर्तनाची दहीहंडी भाजपाच्या वतीने आयोजित करत पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांना त्यांच्या वरळी मतदार संघात घेरण्याचा प्लॅन तयार केला असल्याचे बोलले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.