१७५ पोलीस निरीक्षकांना मिळणार बढती,यादी तयार

100
पोलीस निरीक्षकाच्या बढतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बढतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यभरातील १७५ पोलीस निरीक्षक यांना बढती देण्यात येणार असून या अधिकाऱ्यांच्या नावाची यादी महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयातून काढण्यात आली आहे. लवकरच या अधिकाऱ्यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात येणार आहे.
राज्य पोलीस दलातील पोलीस निरीक्षक यांची पदोन्नती कोरोना काळात रखडली होती. मुंबईसह इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहायक पोलिस आयुक्तपद रिक्त झाले होते. हे पदे भरण्यासाठी राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पोलीस निरीक्षकांची प्रत्येक जिल्ह्यातून यादी मागविण्यात आली होती.
New Project 2022 11 04T155629.391

( हेही वाचा: Mumbai Traffic Update: अंधेरीतील ‘हा’ ब्रीज दोन वर्षांसाठी राहणार बंद )

राज्यभरातून १७५ जणांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून तशी यादी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. लवकरच १७५ पोलीस निरीक्षक यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात येणार आहे.  राज्यभरात २६७ सहाय्यक पोलीस आयुक्तपदे रिक्त असून सर्वात अधिक मुंबईत पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त पदे रिक्त आहेत. पोलीस निरीक्षक यांना पदोन्नती मिळताच ही रिक्त पदे भरून काढण्यात येतील अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.