तुर्की- सिरियात हाहा:कार: 24 तासांत 40 हून अधिक भूकंपाचे धक्के; 4 हजारांहून अधिक बळी

123

निसर्गाच्या कोपापुढे कोणाचे काहीही चालत नाही. हेच तुर्की आणि सिरियात आलेल्या भूकंपात पाहायला मिळते. तुर्की, सिरियात 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत. तुर्कीच्या दक्षिण पूर्व भागात आणि सिरियाच्या उत्तर भागात आलेल्या भीषण भूंकपामुळे अनेक जमिनी पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. साधारण 7.8 ते 7.9 रिश्टर स्केलच्या या भूंकपांमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, तब्बल 3600 जणांचा बळी गेला आहे. जखमींची संख्याही मोठी आहे. इतकेच नव्हे, तर सध्याच्या घडीला मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, असेही सांगण्यात आले आहे.

भविष्यातही कोसळणार इमारती

आतापर्यंत तुर्कीमध्ये एकाहून अधिक भूकंपाचे धक्के बसले असून, पहिला धक्का सोमवारी सकाळी बसला होता. तुर्कीमध्ये 20 हून अधिक वेळा धरणी कंप जाणवले. काहींच्या म्हणण्यानुसार, 46 वेळा असे हादरे जाणवले. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भूंकपाचे हे संकट तुर्कीसाठी भविष्यात आणखी मोठे आव्हान उभे करणारे ठरु शकते. सध्याच्या घडीला इथे आलेल्या अतीप्रचंड तीव्रतेच्या भुंकपामुळे इमारती कोसळल्या आहेत. भुंकपांच्या हाद-यांनंतरही आलेल्या अनेक आफ्टरशाॅकमुळे इथे जमिनीचा अंतर्गत भागच कमकुवत झाला आहे. त्यामुळे भविष्यात येथे अनेक बांधकामे धोक्यात असल्याचे स्पष्ट होत आहे. थोडक्यात भूंकपाचा धक्का आला नाही, तरीही इथल्या इमारती कोसळून जीवितहानी होऊ शकते.

( हेही वाचा: उद्धव ठाकरेंना धक्का; नाशिकमधील ज्येष्ठ शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.