Kolhapur Bandh : आक्षेपार्ह स्टेट्समुळे कोल्हापुरात आज बंदची हाक; 19 जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश

शिवराज्याभिषेक दिनी झालेल्या या प्रकारानंतर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत आज (7 जून) कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.

192
Kolhapur Bandh : तणावपूर्ण शांतता; मात्र इंटरनेट सेवा बंदच

शिवराज्यभिषेक दिनी कोल्हापुरात (Kolhapur Bandh) सात तरुणांनी आक्षेपार्ह व्हाॅट्सअॅप स्टेट्स ठेवल्याने सर्वत्र संतप्त वातावरण झाले आहे. या घटनेनंतर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी या तरुणांविरोधात कारवाई करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

किल्ले रायगडावर मंगळावर ६ जून या दिवशी तारखेनुसार शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek Sohala 2023) सोहळा संपन्न झाला. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर एकूण अडीच लाख मावळे जमले होते. तसेच या सोहळ्यासाठी संभाजीराजे देखील रायगडावर उपस्थित होते.

दगडफेकीचे प्रकार घडले

मात्र याच शिवराज्यभिषेक दिनी कोल्हापुरात (Kolhapur Bandh) सात तरुणांनी आक्षेपार्ह व्हाॅट्सअॅप स्टेट्स म्हणजेच औरंगजेबाचे, टिपू सुलतान फोटो ठेवल्याने सर्वत्र संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी या तरुणांविरोधात कारवाई करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या धरला. ठिय्या धरल्यानंतर कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी, सीपीआर आणि दसरा चौकात दगडफेकीचे प्रकार घडले. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मंगळवारी (6 जून) दुपारी झालेला हा प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरु होता.

कोल्हापुरात बंदची हाक

त्यानंतर आता कोल्हापुरात (Kolhapur Bandh) बंदची हाक देण्यात आली आहे. शिवराज्याभिषेक दिनी झालेल्या या प्रकारानंतर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत आज (7 जून) कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. हिंदुत्ववादी संघटना छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमणार आहेत. शिवाजी चौकात एकत्र आल्यानंतर महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करुन ध्येय मंत्र म्हटला जाणार आहे. यानंतर शहरातील बाजारपेठांमधून मोर्चा काढून बंदचे आवाहन करण्यात येणार आहे, तरी सर्वांनी शिस्तीचे पालन करावे, कोणालाही दमदाटी करु नये, आक्षेपार्ह घोषणा देऊ नये, हात जोडून व्यवहार बंद करण्याची विनंती करावी, असे आवाहन बंडा साळोखे यांनी केलं आहे.

(हेही वाचा – Women’s Hostel Crime : महिला वसतिगृहातल्या सुरक्षा रक्षकाकडून विद्यार्थिनीची बलात्कार करून हत्या; आरोपीची रेल्वेखाली आत्महत्या)

कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश

पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होऊन वा स्टेटसमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकतो. अहवालानुसार अपर जिल्हादंडाधिकारी (Kolhapur Bandh) भगवान कांबळे यांनी 19 जूनच्या रात्री बारापर्यंत जिल्ह्यात बंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा जादा लोक एकत्र जमा होणे, जमाव जमवणे, मिरवणुका काढणे, सभा घेण्यास बंदी आहे. तसेच लाठ्या, काठ्या वा शारीरिक इजा करतील अशा वस्तू, दगड, प्रतिमांचे प्रदर्शन, आवेशपूर्ण भाषणे, हावभाव करणे आदी प्रकारांना मनाई केली आहे.

आंदोलनाचा भाग वगळता इतरत्र परिस्थिती शांततापूर्ण आहे. तिथे नियमित व्यवहार सुरु आहेत; अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.