‘छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचं उदात्तीकरण खपवून घेणार नाही, कोण यांना फुस लावतंय? याची चौकशी करणार…’

101
'छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचं उदात्तीकरण खपवून घेणार नाही, कोण यांना फुस लावतंय? याची चौकशी करणार...'
'छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचं उदात्तीकरण खपवून घेणार नाही, कोण यांना फुस लावतंय? याची चौकशी करणार...'

काही तरुणांनी मोबाईलवर औरंगजेबाचा आणि टिपू सुलतानचा फोटो ठेवल्यामुळे कोल्हापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. बुधवार सकाळपासूनच कोल्हापूर शहर पूर्णतः बंद असून संबंधित तरुणांचा अटक करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांकडून शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू असून सध्या परिस्थिती चिघळली आहे. पोलिसांकडून अश्रू धुराच्या नळकांड्याचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देत अचानकपणे महाराष्ट्रामध्ये औरंजेबाचे उदात्तीकरण करणारे कोण आले? कोण यांना फुस लावतंय? कोण त्यांना अशाप्रकारे उद्तीकरण करण्यास सांगतंय? याची चौकशी करणार असल्याचे फडणवीसांची सांगितले.

फडणवीस विरोधकांवर निशाण साधत म्हणाले की….

‘कोल्हापूरमध्ये विरोधी पक्षाचे नेते म्हणतात की, मला माहितेय या ठिकाणी दंगल घडवण्यात येणार आहे. आणि त्याच्यानंतर काही तरुण त्याठिकाणी औरंगजेब आणि टिपू सुलतान याचं उदात्तीकरण करतात. आणि त्यानंतर त्याठिकाणी रिअ‍ॅक्शन येते. या विधानांचा आणि या घटनांचा काही संबंध आहे का? अचानकपणे महाराष्ट्रामध्ये औरंजेबाचे उदात्तीकरण करणारे कोण आले? कोण यांना फुस लावतंय? कोण त्यांना अशाप्रकारे उदात्तीकरण करण्यास सांगतंय? याची देखील आम्ही चौकशी करतोय. काही गोष्टी आम्हाला त्यातल्या समजतायत. पण सगळी चौकशी झाल्यानंतर मी त्यासंदर्भात काहीतरी सांगेन. पण मी निश्चितपणे सांगतो की, अचानकपणे अशाप्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये औरंगजेबाचं आणि टिपू सुलतानचं उदात्तीकरण होणं, हे काही सहज होत नाही, हा काही योगायोग नाही. आणि त्यातून विरोधी पक्षाच्या लोकांनी वारंवार म्हणणं, की दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे आणि अशा प्रकारे विशिष्ट समजाकडून औरंगजेबाचे कॉइन्सिट्न्स होणं हा योगायोग असू शकतं नाही. त्यामुळे निश्चितपणे याच्या खोलात जावंच लागेल,’ असे फडणवीस म्हणाले.

तसेच शरद पवार आणि नाना पटोलेंच्या विधानावर बोलताना पुढे फडणवीस म्हणाले की, ‘मला आता हे स्पष्टपणे दिसायला लागलं आहे, हे सगळे एका भाषेत बोलतायत आणि एका भाषेत बोलत असताना एका विशिष्ट समाजाचे लोकं त्यांना प्रतिसाद देत औरंगजेबाचे उदात्तीकरण करतायत. आता इथे दंगल सदृश्य परिस्थिती तयार झाली, तिथे ती का होतेय? कारण एक विशिष्ट समजातील लोकं औरंजेबाचे उदात्तीकरण करतायत म्हणून होतेय. आम्ही इथे औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही. हे चालणार नाही, हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे.’

‘औरंगजेब कोणाला जवळचा वाटतो हे आपल्या सर्वांना माहितेय’

‘आता यांचे काही नेते हे औरंगजेबाला देशभक्त देखील ठरवायला निघाले आहेत. आपण बघितलं मागच्या काळात. मी सांगण्याची आवश्यकता नाहीये. त्यामुळे औरंगजेब कोणाला जवळचा वाटतो हे आपल्या सर्वांना माहितेय. म्हणून माझ्यासमोर निश्चित प्रश्न निर्माण झालायं, सगळं एकाच वेळी एकाच सुरात बोलतात आणि त्याला प्रतिसाद लगेच कसा मिळतो, याची देखील कुठेतरी आपल्याला चौकशी करावीच लागेल,’ असे फडणवीसांनी स्पष्ट केले.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.