Mahadev Online Betting App : बॉलीवूड कलाकारांच्या अडचणी वाढवणाऱ्या महादेव ॲपचे असे फुटले बिंग

ईडीची धडक कारवाई

145
Mahadev Online Betting App : बॉलीवूड कलाकारांच्या अडचणी वाढवणाऱ्या महादेव ॲपचे असे फुटले बिंग

काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग ॲप (Mahadev Online Betting App) संबंधित प्रकरणात कोलकाता, भोपाळ व मुंबई येथील तब्बल ३९ ठिकाणी छापे मारून सुमारे ४१७ कोटी रुपये किंमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली.

याप्रकरणी बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडारवर (Mahadev Online Betting App) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ, रणबीर कपूर, कपिल शर्मा, अभिनेत्री सनी लियोनी गायिका नेहा कक्कर, नुसरत भरुचा, विशाल ददलानी, कृष्णा अभिषेक यांच्यासह अनेक दिग्गज सेलिब्रेटी ईडीच्या रडारवर आहेत. यापैकी काही कलाकारांना ईडीकडून समन्स देखील मिळाले आहे.

तेव्हापासून हे महादेव ऑनलाइन बुक बेटिंग ॲप (Mahadev Online Betting App) नेमकं काय आहे? आणि या ॲपचा नेमका पर्दाफाश कसा झाला हे जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

(हेही वाचा – Israel – Palestine Conflict : गाझा पट्टीतल्या संघर्षामुळे कच्च्या तेलाचे दर ४ टक्क्यांनी उसळले )

सौरभ चंद्राकर व रवी उप्पल वा दोघानी या कंपनीची – महादेव ॲपची (Mahadev Online Betting App) निर्मिती केली. याद्वारे तीन पत्ती, पोकर, टेनिस, फूटबॉल, क्रिकेट आदी खेळांसाठी (Mahadev Online Betting App) सट्टेबाजी करण्याची सुविधा पुरवण्यात आली. भारतामध्ये सट्टेबाजी अवैध आहे. युजर आयडी तयार झाला की संबंधित ग्राहकाला त्या ॲपच्या वॉलेटमध्ये पैसे भरावे लागत होते. ग्राहकांना कंपनीच्या वेबसाइटवर अथवा व्हॉट्सॲपवरून या खेळाच्या लिंक मिळायच्या. या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक चुहार आयडी लॉगइन देण्यात आले. हे पैसे भरल्यानंतर त्याना सट्टेबाजी करता येत होती. सट्टा शिकला तर ग्राहकाला त्याच्या खेळानुसार पैसे मिळत होते. या कंपनीने या ॲपच्या प्रमोशनसाठी बॉलीवुडमधील काही नामांकित सेलिब्रिटींना मानधन देत त्यांच्याद्वारे या खेळाचे प्रमोशन करवून घेतले.

ॲपचा गैरप्रकार उजेहात आल्यानंतर कंपनीला फटका बसू नये याकरिता कंपनीने तीन ते चार वेबसाइट तसेच चार आणखी नवीन लिंक तयार करत त्याद्वारेदेखील व्यवहार सुरू ठेवले होते.

युजर आयडी मिळाल्यानंतर ग्राहकांनी जे पैसे कंपनीच्या खात्यात जमा केले होते तेच पैसे हे या कंपनीचे खरे उत्पन्न होते. प्रत्येकवेळी ग्राहक जिंकत होता असे नाही. मात्र त्याला सवय लागल्यामुळे तो अधिकाधिक पैसे त्याच्या वॉलेटमध्ये भरत होता. एखादा ग्राहक जिंकला तर त्याला कंपनीतर्फे पैसे मिळत होते, ते पैसे बँक खात्यातून संबंधित ग्राहकाल मिळत होते. बँकेतले हे खातेदेखील कंपनीच्या नावर नव्हते याकरिता त्यांनी काही लोकांच्या ओळखपत्राचा आधार घेतला होता.

असे फुटले बिंग …

कंपनीचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याचा विवाह फेब्रुवारी २०२३मध्ये दुबईमध्ये झाला. या लग्नाकरिता भारतातून अनेक नामवंत बॉलिवूड कलाकार, आणि काही बड्या हस्ती तिथे उपस्थित राहिल्या. या कलाकारांना दुबईत नेण्याकरिता भारतातून तब्बल १५०पेक्षा जास्त चार्टर्ड विमाने बुक करण्यात आली होती. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर चार्टर्ड विमाने दुबईत जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तपास यंत्रणा अलर्ट झाल्या व त्यांनी या प्रकरणी तपास सुरू केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.