Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूरला ईडीचे समन्स; ६ ऑक्टोबरला होणार चौकशी

105
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूरला ईडीचे समन्स; ६ ऑक्टोबरला होणार चौकशी

काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग ॲप संबंधित प्रकरणात कोलकाता, भोपाळ व मुंबई येथील ३९ ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडारवर (Ranbir Kapoor) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.

अशातच आता या संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभिनेता रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) समन्स बजावला आहे. ईडीने रणबीरला उद्या म्हणजेच शुक्रवार ६ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.

(हेही वाचा – Ujani Dam : परतीच्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होईल, जलसंपदा विभागाची माहिती)

ऑनलाइन गेमिंग ॲप प्रकरणातील आरोपी सौरभ चंद्राकरच्या लग्नाला रणवीर (Ranbir Kapoor) आणि महादेव सहभागी झाला होता. सौरभवर हवालाद्वारे कलाकारांना पैसे दिल्याचा आरोप आहे. रणबीर कपूर या ॲपचे प्रमोशन करत होता. त्याला मोठी रक्कम रोख स्वरूपात मिळाल्याचा ईडीचा दावा आहे. ईडी ऑनलाइन गेमच्या जाहिरातींद्वारे निधीची देखील चौकशी करेल. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ईडीसमोर हजर राहतो की त्याच्या वकिलामार्फत समन्सला उत्तर देणार याबाबत उत्सुकता आहे.

या प्रकरणी ईडीकडून (Ranbir Kapoor) आतापर्यंत टायगर श्रॉफ, नुसरत भरूचा, सुखविंदर सिंग, नेहा कक्कर आणि सनी लिओन यांच्यासह १७ सेलिब्रिटींची चौकशी करू शकते अशी बातमी यापूर्वी आली होती. आता या यादीत रणबीरच्या नावाचाही समावेश झाला आहे. सध्या ईडी ५ हजार कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात दुबईतून ऑनलाइन बेटिंग ॲप चालवणारे सौरभ चंद्राकर आणि त्याचा व्यवसाय भागीदार रवी उप्पल यांची चौकशी करत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.