ED Raid : टायगर श्रॉफ, सनी लिओनी आणि नेहा कक्करसह १४ कलाकार ईडीच्या रडारवर

'महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप'वर ईडीची छापेमारी

19
ED Raid : टायगर श्रॉफ, सनी लिओनी आणि नेहा कक्करसह १४ कलाकार ईडीच्या रडारवर

सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग ॲप (ED Raid) संबंधित प्रकरणात कोलकाता, भोपाळ व मुंबई येथील ३९ ठिकाणी छापे टाकले असून याप्रकरणी सुमारे ४१७ कोटी रुपये किंमतीची मालमत्ता गोठवण्यात अथवा जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.

यामध्ये बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडारवर (ED Raid) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री सनी लियोनी गायिका नेहा कक्कर, नुसरत भरुचा, विशाल ददलानी, कृष्णा अभिषेक यांच्यासह अनेक दिग्गज सेलिब्रेटी ईडीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचा – Lift Accident : पुन्हा एकदा लिफ्ट कोसळून चार कामगारांचा जागीच मृत्यू)

मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीकडून (ED Raid) आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामधून कोटयवधी रुपयांच्या रोख देवाण-घेवाणीची चौकशी होणार आहे. विदेशातील एका मोठ्या लग्नसोहळ्यात बॉलीवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. त्यांना एका प्रायव्हेट प्लेनमधून त्या लग्नासाठी नेण्यात आले होते, अशीही माहिती समोर आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.