Jack Nicklaus : जाणून घ्या सर्वोत्कृष्ट आणि सर्वकालीन महान गोल्फर जॅक निकलॉस यांच्याबद्दल

जॅक निकलॉस यांनी १६४ प्रमुख स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि ७३ पीजीए टूर जिंकल्या आहेत. निक्लॉस यांच्या नावावर मास्टर्समध्ये सर्वाधिक सहा आणि द प्लेअर्स चॅम्पियनशिपमध्ये तीन ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम आहे.

123
Jack Nicklaus : जाणून घ्या सर्वोत्कृष्ट आणि सर्वकालीन महान गोल्फर जॅक निकलॉस यांच्याबद्दल

जॅक विल्यम निकलॉस (Jack Nicklaus) हे निवृत्त अमेरिकन व्यावसायिक गोल्फर आणि गोल्फ कोर्स डिझायनर आहेत. त्यांना “गोल्डन बेअर” असेही म्हणतात. त्यांचा जन्म २१ जानेवारी १९४० रोजी कोलंबस, ओहियो येथे झाला. ते मूळचे जर्मन वंशाचे आहेत. गोल्फर म्हणून ते जगातले सर्वोत्कृष्ट आणि सर्वकालीन महान गोल्फर मानले जातात.

(हेही वाचा – Ayodhya Shri Ram Mandir : प्राण प्रतिष्ठेसाठी अयोध्या सजली)

विशेष म्हणजे ते (Jack Nicklaus) गोल्फ कोर्स डिझायनरसुद्धा आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ११७ व्यावसायिक स्पर्धा जिंकल्या आहेत आणि विक्रमी १८ प्रमुख चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत, तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या टायगर वुड्सपेक्षा तीन अधिक स्पर्धा जिंकल्या. त्यांचे लक्ष प्रमुख चॅम्पियनशिपवर नेहमीच जोते – जसे की ट, यू.एस ओपन, ओपन चॅम्पियनशिप आणि पीजीए चॅम्पियनशिप.

(हेही वाचा – Weather Update : राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट! ‘या’ भागात पावसाची शक्यता)

त्यांनी (Jack Nicklaus) १६४ प्रमुख स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि ७३ पीजीए टूर जिंकल्या आहेत. निक्लॉस यांच्या नावावर मास्टर्समध्ये सर्वाधिक सहा आणि द प्लेअर्स चॅम्पियनशिपमध्ये तीन ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम आहे. त्यांनी Golf My Way नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.