Ayodhya Shri Ram Mandir : प्राण प्रतिष्ठेसाठी अयोध्या सजली

२२ जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरात श्री रामललाच्या सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी नववधू सारखी सजली आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर अनेक कार्यक्रम होणार आहे. अशातच प्राण प्रतिष्ठेनंतर संपूर्ण अयोध्या सायंकाळी १० लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार घर, दुकाने, प्रतिष्ठान आणि पौराणिक स्थळांवर रामज्योती प्रज्वलित करण्यात येणार आहे.

227
Ayodhya Shri Ram Mandir : प्राण प्रतिष्ठेसाठी अयोध्या सजली

प्रभू श्रीरामांच्या बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्यानगरी (Ayodhya Shri Ram Mandir) सजली आहे. उद्या (सोमवार २२ जानेवारी) होणाऱ्या सोहळ्यासाठी तयारी पूर्ण होत आली आहे. अशातच शनिवार २० जानेवारी या अनुष्ठानाच्या पाचव्या दिवशी पहाटे शर्कराधिवास, फलाधिवास हे विधी करण्यात संपन्न झाले. त्यानंतर संध्याकाळी पुष्पाधिवास विधी पार पडला.

(हेही वाचा – Ayodhya Shri Ram Mandir : अयोध्येत श्रीराम मंदिरात स्थापन होणाऱ्या बालस्वरूप रामललाच्या मूर्तीची निर्मिती कशी झाली?)

या सोहळ्यासाठी (Ayodhya Shri Ram Mandir) सरस्वती, सिंधू नदीचे पाणी पाकव्याप्त काश्मीरमधून आणण्यात आले आहे. तसेच कावेरी नदीचे पाणीदेखील अयोध्येत पोहोचले आहे. शैव शारदा समितीचे सदस्य मंजूनाथ शर्मा यांनी सांगितले की, भारतात सात नद्यांना महत्त्वाचे स्थान असून त्यातील पाच नद्या भारतात व दोन नद्या पाकिस्तानात आहेत.

मध्याधिवास, शय्याधिवासाचे विधी – 

अयोध्येच्या राममंदिरात आज म्हणजेच रविवार २१ जानेवारी रोजी पहाटे मध्याधिवास, त्याच दिवशी संध्याकाळी शय्याधिवास असे दोन महत्त्वाचे विधी होणार आहेत. त्यानंतर २२ जानेवारीला सोमवारी दुपारी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: राम मंदिर आधुनिक भारताचा सौहार्द संस्कृती सेतू !)

अयोध्येत दिवाळी – 

२२ जानेवारीला संध्याकाळी १०० प्रमुख मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी दीपप्रज्वलन करण्यात येणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. योगी सरकारने २०१७ मध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर दीपोत्सवाचे आयोजन केले होते, हे विशेष. २०१७ मध्ये १.७१ लाख दिव्यांनी अयोध्येला सजवणाऱ्या सरकारने २०२३ च्या दीपोत्सवात २२.२३ लाख दिव्यांची सजावट करून नवीन विक्रम केला होता. त्याचवेळी श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर संपूर्ण अयोध्या (Ayodhya Shri Ram Mandir) दिव्यांनी सजवण्यात येणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.