Infinix Note 30 Pro : इन्फिनिक्स नोट ३० प्रो देतो थोड्या किमतीत खूप सारे फिचर्स 

इन्फिनिक्स कंपनीने आपल्या लोकप्रिय नोट प्रकारातील आधुनिक फोन नोट ३० प्रो बाजारात आणला आहे. ५जी सुविधा असलेला हा फोन कंपनीच्या लौकिकाप्रमाणेच थोड्या पैशात खुप साऱ्या सुविधा देणारा फोन आहे 

157
Infinix Note 30 Pro : इन्फिनिक्स नोट ३० प्रो देतो थोड्या किमतीत खूप सारे फिचर्स 
Infinix Note 30 Pro : इन्फिनिक्स नोट ३० प्रो देतो थोड्या किमतीत खूप सारे फिचर्स 

ऋजुता लुकतुके

मोबाईल फोन्समध्ये व्हॅल्यू फॉर मनी म्हणजेच व्हीएफएम (Infinix Note 30 Pro) ही संकल्पना खूप रुळलेली आहे. म्हणजे अशा मोबाईलमध्ये गेमिंग, कॉलिंग आणि कॅमेरासाठी लागणारे सगळे आधुनिक फिचर्स असतात. पण, फोनची किंमत अगदीच वाजवी किंवा किफायतशीर असते.

हाँगकाँगमधील इनफिनिक्स ही कंपनी असे व्हीएफएम फोन बनवण्यासाठीच ओळखली जाते. कंपनीचा नोट सीरिजचा फोन अलीकडे चांगलाच चालला होता. त्यानंतर आता कंपनीने याच फोनचं अत्याधुनिक मॉडेल इन्फिनिक्स नोट ३० प्रो बाजारात आणला आहे. आणि त्याची किंमत आहे १४,६९९ रुपये.

पैशाच्या मानाने या फोनची फिचर्स किती उजवी आहेत ते समजून घेऊया. 

कंपनीने ५जी तंत्रज्ञानात झालेल्या बदलांनंतर खास हा ५जी सुविधा देणारा फोन लाँच केला आहे. वाजवी किमतीबरोबरच इन्फिनिक्सचे फोन त्याच्या डिझाईनसाठी ओळखले जातात. या फोनमध्येही तज्ज्ञांनी फोनचं डिझाईन, बॅटरी, कॅमेरा तसंच ऑपरेटिंग प्रणालीला ५ पैकी ४ गुण दिले आहेत.

(हेही वाचा-Motorola Smartphone : मोटोरोलाचा असा फोन जो मनगटाभोवती गुंडाळता येतो )

आताही या स्मार्टफोनमध्ये एमोल्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याची प्रखरता १२०० हर्ट्झ इतकी आहे. तर स्क्रीनचा आकार ६.७ इंच इतका आहे. अँड्रॉईड १३ या अत्याधुनिक प्रणालीवर हा फोन चालतो. ८ जीबी रॅम असलेल्या या फोनमध्ये किमान २५६ जीबी इतकी साठवणूक क्षमता देण्यात आली आहे. आणि ती १ टीबी इतकी वाढवता येऊ शकेल. त्यासाठी एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

इन्फिनिक्सचा कॅमेराही (Infinix Note 30 Pro) चांगला आहे. प्राथमिक कॅमेरा १२८ मेगापिक्सलचा आहे. तर सेल्फी कॅमेरा १६ मेगापिक्सलचा आहे. मॅजिक ब्लॅक आणि व्हेरिएबल गोल्ड या दोन रंगात हा फोन उपलब्ध आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.