Beed Accident : एकाच रात्री दोन अपघात; १० जणांचा मृत्यू

22
Beed Accident : एकाच रात्री दोन अपघात; १० जणांचा मृत्यू

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात (Beed Accident) काल रात्री मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दहा जणांचा जागीच मृत्यू झाला. यात पहिला अपघात रुग्णवाहिका आणि ट्रकचा झाला, तर दुसरा अपघात हा सागर ट्रॅव्हल्स नावाच्या खाजगी बसचा झाला आहे. दोन्ही अपघातात आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

बीड धामणगावहून अहमदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर (Beed Accident) दौलावडगावजवळ असलेल्या बँकॉक कंपनीकडे वळत असताना ट्रक आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. यात डॉक्टरसह चौघा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

(हेही वाचा – Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन)

तर जामखेड अहमदनगर मार्गावर आष्टा फाट्याजवळ (Beed Accident) सागर ट्रॅव्हल्स या खाजगी बसच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही बस पलटी झाली. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयंकर होता, की प्रवाशांना बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली. (Beed Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.