Hindu : दंगलीतील पीडित हिंदूंसाठी काय करावे; आमदार कपिल मिश्रा यांनी सांगितला मार्ग

गोव्यात सुरू आलेल्या वैश्विक हिंदू अधिवेशनामध्ये हिंदू इको सिस्टम चे महत्व या विषयावर आमदार मिश्रा बोलत होते.

105
Hindu : दंगलीतील पीडित हिंदूंसाठी काय करावे; आमदार कपिल मिश्रा यांनी सांगितला मार्ग

देशात मुसलमान त्यांची इको सिस्टीम वापरून त्यांच्या लोकांना मदत करतात त्यांना या कामासाठी निधर्मी, पुरोगामी मदत करतात, हिंदू मात्र बहुसंख्यांक आहेत परंतु ते दंगलीत मार खातात, अशा हिंदूंचे रक्षण करण्याठी नवीन इको सिस्टीम करावी लागेल, असे भाजपचे दिल्ली आमदार कपिल मिश्रा म्हणाले.

गोव्यात सुरू आलेल्या वैश्विक हिंदू अधिवेशनामध्ये हिंदू इको सिस्टम चे महत्व या विषयावर आमदार मिश्रा बोलत होते.

जो भारतविरोधी आहे तो हिंदूविरोधी असतो आणि जो हिंदूविरोधी आहे तो भारतविरोधी असतो. असे उदाहरण जगात एकच आहे. पुरोगामी, नक्षलवादी हे सगळे भारत विरोधी असतात तसेच हिंदूविरोधी असतात. २०२२ ला दिल्लीत राम नवमी यात्रा काढली, ती जहांगीरपूर येथे आली, तेव्हा मुसलमानांनी दगडफेक केली. गोळीबार केला ज्यात एक गोळी पोलिसाला लागली, पोलिसांनी रात्री ८ वाजता त्यांचा म्होरक्या मुसलमान तरुणाला ताब्यात घेतले, तेव्हा तो हसत होता, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्ट उघडायच्या आता कोर्टाबाहेर ४-५ मोठ्या वकिलांची फौज तयार होती, ती त्याला सोडवण्यासाठी आली होती, हा म्होरक्या गरीब आहे, तरीही वकिलांची फौज कशी आली. कारण त्यांना जमियत ए उलेमा हिंद या संस्थेने पैसे दिले होते. ही तीच संस्था आहे जिने आमची राजकीय शक्ती वाढली की बांधलेले राम मंदिर पाडू असे म्हटले होते. या संस्थेला हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून पैसा मिळतो आणि तो पैसा ही संस्था धर्मांध मुसलमान, दहशतवादी मुसलमान यांच्यासाठी वापरते. ही त्यांची इको सिस्टम आहे, असे भाजपचे आमदार कपिल मिश्राम्हणाले.

(हेही वाचा – International Yoga Day 2023: नियमित योगाभ्यासाने होणारे ‘हे’ आहेत दहा फायदे)

दिल्ली दंगलीच्या वेळी एक मुलगा बंदूक घेऊन पोलिसांसमोर उभा होता, त्याचा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला, रवीश कुमार त्याचे नाव रोहित सांगतो, वास्तवात त्याचे नाव शाहरुख पठाण असते. याच दंगलीत १८ वर्षांखालील मुलांना पोलिस ठाणे जाळायला पाठवले, कारण अल्पवयीन म्हणून त्यांना लगेच जामीन मिळाला, हा देखील इको सिस्टिमचा भाग होता.

आम्ही आमचा हिंदू भाऊ दंगलीत पीडित असेल तर आम्ही त्याच्या कुटुंबीयासमवेत राहतो, दिल्ली दंगलीत हिंदू पीडितांना आम्ही मदत दिली. त्यांच्या कुटुंबियांसाठी २ कोटी रुपये जमवले. कन्हैयालाल आणि नेत्तारू यांची हत्या करून मुसलमानांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र हिंदूंनी त्या पीडितांच्या कुटुंबासोबत राहून मुसलमानांचा डाव उधळला, असेही कपिल मिश्रा म्हणाले. हिंदूंनी आता एकत्र यायला पाहिजे, त्यासाठी त्यांनी आधी जातपातीचा भेदभाव करता कामा नये. हिंदू बटा मतलब देश कटा, अशी परिस्थिती आहे, असेही कपिल मिश्रा म्हणाले.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.