Muhammad Ali मुष्टियोद्धा कसा झाला?

162
मुहम्मद अली (Muhammad Ali) हा अमेरिकन व्यावसायिक बॉक्सर होता. बॉक्सिंगच्या जगतात त्याला सर्वात खतरनाक आणि सर्वात मोठा बॉक्सर म्हणजेच मुष्टियोद्धा म्हटले जाते. तीन वेळा लेनियल चॅम्पियनशिप जिंकणारा अली हा एकमेव जागतिक हेवीवेट चॅम्पियन आहे. तो १९६४, १९७४ आणि १९७८ मध्ये ही चॅम्पियनशिप जिंकणारा खेलाडू होता.
मुहम्मद अलीची (Muhammad Ali) खासियत अशी की त्याने २५ फेब्रुवारी १९६४ आणि १९ सप्टेंबर १९६४ दरम्यान हेवीवेट बॉक्सिंग चॅम्पियन म्हणून राज्य केले. अलीचे फूटवर्क जबरदस्त असायचे आणि रिंगमध्ये त्याने लगावलेले ठोसे तर भयावह असायचे. याच गोष्टींसाठी तो ओळखला जायचा. कॅसियस मर्सलास क्ले, जूनियर म्हणजेच मुहम्मद अलीचा जन्म १७ जानेवारी १९४२ रोजी झाला. कॅसियस मर्सलास क्ले हे नाव त्याच्या वडिलांच्या नावावरुन ठेवलं होतं.
१९९९ मध्ये बीबीसीने मुहम्मद अलीला (Muhammad Ali) शतकातील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून घोषित केले. अलीने १९६० साली ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकले होते. महम्मद अली एक जबरदस्त खेळाडू होता. तो या खेळाकडे कसा वळला, ही कथा देखील गंमतीदार आहे. ज्या चोराने अलीची सायकल चोरली त्या चोराला मारण्याची अनुमती त्याने पोलीस अधिकारी मार्टिनकडे मागितली. मार्टिन म्हणाला की आधी तुला लढता आलं पाहिजे. मग मार्टिनकडे त्याने मुष्टियुद्धाचे धडे गिरवले. अशा प्रकारे मुहम्मद अली बॉक्सर झाला.
मुहम्मद अलीचे (Muhammad Ali) वडील गुलामगिरीच्या प्रथेविरुद्ध लढत होते. ते सेक्युलर विचारांचे होते. मात्र त्यांनी पत्नीच्या सांगण्यानुसार अलीचा बाप्तिस्मा होऊ दिला होता. अलीच्या आईने बॉक्सिंग करण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिले. मात्र पुढे १९६४ ला ’नेशन ऑफ इस्लाम’ या संघटनेत तो सामील झाला आणि १९७५ मध्ये त्याने आपला धर्म बदलला व तो मुस्लिम झाला. अशाप्रकारे कॅसियस मर्सलास क्ले, जुनियर झाला मुहम्मद अली. ३ जून २०१६ रोजी त्याचा मृत्यू झाला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.