अभिनयापासून राजकारणात प्रभाव पाडणारे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रदन म्हणजेच MGR

123
मरुथुर गोपालन रामचंद्रन हे एमजी रामचंद्रन किंवा एमजीआर (MGR) म्हणून ओळखले जातात. ते प्रसिद्ध भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता आणि राजकारणी होते. अभिनय आणि राजकारण म्हणजे एमजीआर यांच्या आयुष्यातील प्रमुख भाग. त्यांच्या अभिनयाची सुरुवात एकांकिका सादर करुन झाली. अगदी तरुणपणी ते नाट्यसंस्थांमधून एकांकिकेत काम करायचे.
त्याचबरोबर ते तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले होते. इंदिरा गांधींना ते आदर्श मानायचे. ३० वर्षांहून अधिक काळ तामिळ चित्रपटसृष्टीवर राज्य करणारे एमजी रामचंद्रन (MGR) यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नंतर त्यांनी द्रमुक पक्षाशी हातमिळवणी केली. दक्षिण भारतात अभिनेते राजकारणात यश मिळवू शकतात. ही प्रथा एमजीआर यांनीच पाडली.
एमजीआर (MGR) यांनी पुढे ADMK नावाचा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला. यानंतर ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. एमजी रामचंद्रन हे राज्याचे मुख्यमंत्री होणारे पहिले भारतीय चित्रपट कलाकार आहेत. सेवाभावी कार्ये आणि गरजू आणि गरीब लोकांसाठी त्यांनी अनेक कार्ये केली असल्याचे म्हटले जाते.
त्यांचा जन्म १७ जानेवारी १९१७ रोजी सेलन येथे झाला. आता सेलन श्रीलंकेत आहे. काही वर्षे नाटकांमध्ये काम केल्यानंतर, एमजीआर १९३५ मध्ये तामिळ चित्रपट क्षेत्रात आले. १९३६ मध्ये त्यांचा अभिनेता म्हणून पहिला चित्रपट आला. “साथी लीलावथी” या चित्रपटात त्यांनी सहाय्यक भूमिका केली होती.  पुढे करुणानिधी यांनी लिहिलेल्या ’राजकुमारी’ या चित्रपटात त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि ते रोमॅंटिक व ऍक्शन हीरो म्हणून उदयास आले. त्यानंतर एमजीआर यांनी तमिळ चित्रपटसृष्टीवर तीन दशके राज्य केले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.