सकल हिंदू समाजाच्या वतीने आरे कॉलनीत काढण्यात आला ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’

86

आरे कॉलनीतील राम मंदिर शेजारील प्रस्तावित मुस्लिम कब्रस्तानाला सकल हिंदू समाजाच्या वतीने विरोध करण्यात येत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी रविवार १२ फेब्रुवारी रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने आरे कॉलनीत ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्च्यात मोठ्या संख्येने हिंदूंनी सहभाग घेतला होता.

या हिंदू जन आक्रोश मोर्चात सर्व उत्सव मंडळे, समित्या तसेच नागरिकांच्या आणि हिंदूंच्या हितासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला होता. या आधीही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लव्ह जिहाद आणि लॅण्ड जिहाद तसेच दररोजच्या कर्णकर्कश भोंग्यांच्या आवाजाने त्रासलेल्या मुंबईकरांनी या मोर्चात सहभागी होत आपला विरोध दर्शविला आहे. सर्व अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी या मंचाचा हिंदूंनी सदुपयोग केला.

राम मंदिराशेजारी होणाऱ्या कब्रस्तानाला विरोध

रविवारी आरे कॉलनीत काढण्यात आलेला मोर्चा हा आरे कॉलनीतील पुरातन राम मंदिराच्या शेजारी होत असलेल्या मुस्लिम कब्रस्तानाला विरोध करण्यासाठी होता. हा संपूर्ण मोर्चा नियमांचे पालन करत काढण्यात आला. हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन सकल हिंदू समाज, मुंबई यांच्यावतीने करण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.