Hindenburg Issue : अदानी – हिंडेनबर्ग प्रकरणात सेबी नक्की कसली चौकशी करत आहे? 

अदानी हिंडेनबर्ग प्रकरणात सेबी करत असलेल्या चौकशीत हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. पण, सेबी या प्रकरणी नेमकी कसली चौकशी करतेय ते माहीत आहे का? 

125
Hindenburg Issue : अदानी - हिंडेनबर्ग प्रकरणात सेबी नक्की कसली चौकशी करत आहे? 
Hindenburg Issue : अदानी - हिंडेनबर्ग प्रकरणात सेबी नक्की कसली चौकशी करत आहे? 

ऋजुता लुकतुके

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी, अदानी समुहावर हिंडेनबर्गने (Hindenburg Issue) केलेल्या आरोपांविषयीची चौकशी सेबीने पुढील तीन महिन्यांत संपवावी असे निर्देश दिले. या विषयी दोन प्रकरणांची चौकशी सेबीकडून सध्या प्रलंबित आहे. शिवाय ही चौकशी करताना सेबीच्या कामात न्यायालय ढवळाढवळ करणार नाही, असंही कोर्टाने स्पष्ट केलं.

अदानी समुहाविरुद्ध सेबी नेमकी कुठली चौकशी करतेय असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल.

ही दोन प्रकरणं आहेत हिंडेनबर्ग यांनी अदानी समुहावर केलेल्या आरोपांची. पहिला आरोप आहे तो शेअर बाजाराचे नियम डावलून अदानी समुहाच्या शेअरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त खाजगी भागिदारी असल्याचा आरोप. म्हणजे कंपनीचे किती शेअर हे लोकांच्या विक्रीसाठी खुले असावेत आणि किती शेअर एकाच व्यक्ती किंवा कंपनीकडे ठेवता येतील याचे शेअर बाजाराचे आणि पर्यायाने सेबीचे काही नियम आहेत.

(हेही वाचा-Wrestlers Protest : नवी दिल्लीत पुन्हा कुस्तीपटू बसले आंदोलनाला; यावेळी बजरंग, साक्षीच्या विरोधात )

अदानी समुहाच्या शेअरच्या बाबतीत लोकांना विक्रीसाठी खुले असलेले शेअर हे आवश्यक प्रमाणापेक्षा कमी होते, असा हिंडेनबर्गचा आरोप होता. थोडक्यात, शेअर बाजारात कंपनीची नोंदणी असतानाही, लोकांचं कंपनीवर फारसं नियंत्रण नव्हतं. आणि काही लोक किंवा कंपन्या एकत्र येऊन कृत्रिमरित्या या कंपन्यांचे शेअर नियंत्रित करत होते, असा हा आरोप आहे.

तर दुसरा आरोप आहे हिंडेनबर्ग यांचा अहवाल आल्यानंतर आणि तो येण्यापूर्वी अदानी समुहाच्या शेअरमध्ये किती आणि कुठले व्यवहार झाले याचाही आढावा सेबीने घ्यायचा आहे.

अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअरमध्ये परदेशातून होत असलेल्या गुंतवणुकीविषयी सेबीने प्रतिज्जापत्र सादर केलं आहे. यात १२ परदेशी संस्था सेबीने शोधून काढल्या असून त्यांच्याविषयीची माहिती आणि त्यांनी केलेली खरेदी-विक्री सेबीने कोर्टासमोर नमूद केली आहे. आणि या कंपन्यांकडून स्पष्टीकरण मागवल्याचं सेबीनं सध्या म्हटलंय.

दुसऱ्या आरोपाची चौकशी करतानाही सेबीने अमेरिकेतील काही कंपन्यांकडून त्यांचे खरेदी-विक्रीचे अहवाल मागवले आहेत. आणि ते अजून सेबीला मिळाले नसल्याचं सेबीचं म्हणणं आहे. मात्र त्याचवेळी काही कंपन्यांनी अदानी समुहातील शेअरमध्ये केलेली कमी मुदतीची गुंतवणूक ही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असंही कोर्टासमोर सेबीने पूर्वी म्हटलं आहे. पण, त्याचा अंतिम अहवाल अजून सादर केलेला नाही.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.