Amol Kirtikar यांच्या प्रचारात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा सहभाग

अमोल किर्तीकर यांचा प्रचार १९९३ च्या ब़ॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा सक्रियपणे करत आहेत.

174

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांच्या प्रचारात बॉम्बस्फोटातील आरोपी सहभागी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. यावरून भाजपाने ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. भाजपा आमदार अमित साटम यांनी बुधवारी संध्याकाळी अंधेरी पश्चिम येथे मविआ उमेदवार अमोल किर्तीकरांच्या प्रचारात १९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान उतरला होता. किर्तीकरांच्या समर्थनार्थ हा रॅलीत होता. त्यामुळे ही लढाई राष्ट्रवादीविरोधात तुकडे तुकडे गँगशी आहे, अशी टीका केली.

(हेही वाचा औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलण्याच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका Bombay High Court फेटाळली)

उबाठाचे संबंध देशद्रोह्यांशी 

अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांचा प्रचार १९९३ च्या ब़ॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा सक्रियपणे करत आहेत. त्याचबरोबर लष्कर भरतीचे पेपर फोडणारा आरोपी  महेंद्र सोनावणे हा उबाठाचे शिर्डीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांचा प्रचार प्रमुख आहे. भारतीय लष्करात पाकिस्तानी धार्जिणे लोकांची भरती कशी करता येईल, असा या सोनावणे याचा डाव होता, तर १९९३ च्या बॉम्बस्फोटात मुंबईतील शेकडो निष्पापांचे जीव घेणाऱ्या आरोपींसोबत उबाठाचा प्रचार पाहून हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला वेदना होत असतील, उबाठाचे संबध देशद्रोह्यांशी आहेत. यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान झाला आहे, असा निशाणा शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंवर साधला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.