Lok Sabha Elections 2024 : काँग्रेसच्या जागावाटप प्रस्तावावरून वाद वाढण्याची चिन्हे

राज्यातील काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला पक्षश्रेष्ठींकडे दिला असून यात सर्वाधिक २१ जागा काँग्रेसच्या वाट्याला दिल्या गेल्या असल्याचे समजते.

163
Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी काँग्रेसकडून समन्वयकांची नियुक्ती
Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी काँग्रेसकडून समन्वयकांची नियुक्ती
  • सुजित महामुलकर

राज्यातील काँग्रेसने (Congress) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) जागावाटपाचा फॉर्म्युला पक्षश्रेष्ठींकडे दिला असून यात सर्वाधिक २१ जागा काँग्रेसच्या (Congress) वाट्याला दिल्या गेल्या असल्याचे समजते. तर वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि स्वाभिमानी पक्षाला (Swabhimani party) गृहीत धरून त्यांच्यासाठी ३ जागा सोडण्यात आल्याचे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. (Lok Sabha Elections 2024)

वंचित, स्वाभिमानी पक्षाला गृहीत धरले

काँग्रेसच्या (Congress) जागावाटपानुसार पक्षाने काँग्रेस २१, उबाठा १८, राष्ट्रवादी (शरद पवार गट) ६, वंचित बहुजन आघाडी २ आणि स्वाभिमानी पक्षासाठी एक जागा असा प्रस्ताव आहे. वास्तविक, स्वाभिमानी पक्षाने या आधीच स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच ६ जागा लढण्याची तयारीदेखील केली असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले आहे. (Lok Sabha Elections 2024)

(हेही वाचा – Shivdi-Nhava Sheva Sea Link : ‘अटल सेतू शिवडी-न्हावा शेवा सी लिंक’ १२ जानेवारीला होणार सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन)

उबाठा कमी जागा घेणार?

उबाठाने (UBT) यापूर्वीच २३ जागांची मागणी केली असून काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी चर्चा झाल्याचे उबाठा नेते संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. आता काँग्रेसच्या या प्रस्तावबाबत उबाठा (UBT) काय भूमिका घेते, यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (Lok Sabha Elections 2024)

वंचितला केवळ २ जागा

दरम्यान, वंचितला इंडी आघाडीत (I.N.D.I. Alliance) स्थान द्यायचे की नाही यांचा निर्णय अद्याप झाला नसून त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता त्यांच्यासाठी केवळ २ जागा सोडल्याने वंचित आघाडीत नाराजीचा सूर आहे. ४८ जागांची तयारी केली असताना केवळ २ जागांसाठी ४६ जागांवर पाणी का सोडायचे, असा प्रश्न वंचित आघाडीने केला आहे. (Lok Sabha Elections 2024)

एकूणच काँग्रेसच्या (Congress) या जागावाटप प्रस्तावावर एकमत न होता महाविकास आघाडीत आणखी वाद वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Lok Sabha Elections 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.