Gudi Padwa 2024 : मंगलमय आणि चैतन्यमय शोभायात्रा

महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी हा सण दिमाखदार शोभायात्रा काढून साजरा केला जातो. यावेळी पारंपरिक वेशभूषा, सामाजिक, सांस्कृतिक संदेश देणारे चित्ररथ, मातीतील कसरती, आकर्षक-नयनरम्य रांगोळ्या, लेझीम पथक, युवाशक्ती पथक, आदिशक्ती पथक, शक्तिप्रदर्शन, ढोल-ताशांचा गजर, असे भारतीय संस्कृतीचे अनोखेपण समाजमनावर बिंबवणाऱ्या या शोभायात्रा आजही गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी मंगलमय आणि चैतन्यदायी वातावरणात शहरात काढल्या जातात.

158
Gudi Padwa 2024 : मंगलमय आणि चैतन्यमय शोभायात्रा
  • नमिता वारणकर

गुढीपाडवा! हिंदु नववर्षाची सुरुवात!! चैत्र महिन्यात येणाऱ्या या सणाचे प्रतीक म्हणजे घरोघरी उभारली जाणारी गुढी. साडेतीन मुहूर्तांपैकी एक, विजयाचं प्रतीक, असत्यावर सत्याचा विजय, सुखसमृद्धी, भरभराट, आयुरारोग्य अशा शुभेच्छांसह आपआपसांतील आनंद द्विगुणित करण्याची शिकवण देणारा हा सण. या दिवसाला आध्यात्मिक, वैज्ञानिक महत्त्व आहेच शिवाय मराठी संस्कृती, परंपरा यांची किनारही आहे. महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी हा सण दिमाखदार शोभायात्रा काढून साजरा केला जातो. यावेळी पारंपरिक वेशभूषा, सामाजिक, सांस्कृतिक संदेश देणारे चित्ररथ, मातीतील कसरती, आकर्षक-नयनरम्य रांगोळ्या, लेझीम पथक, युवाशक्ती पथक, आदिशक्ती पथक, शक्तिप्रदर्शन, ढोल-ताशांचा गजर, असे भारतीय संस्कृतीचे अनोखेपण समाजमनावर बिंबवणाऱ्या या शोभायात्रा आजही गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी मंगलमय आणि चैतन्यदायी वातावरणात शहरात काढल्या जातात. शोभायात्रांची सुरुवात आणि त्यांचे अनोखेपण आणि सामाजिक संदेश देत केलेल्या कलात्मक प्रवासाचा लेखाद्वारे घेतलेला आढावा… (Gudi Padwa 2024)

तरुणांना हिंदू संस्कृतीशी जोडणाऱ्या शोभायात्रा

आपल्या भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांचे महत्त्व अपार आहे. सणांमुळे पारंपरिक चालीरिती, परंपरा आजही जपल्या जात आहेत. सण-उत्सवांमुळे श्रद्धा, संस्कृती, परंपरांची जपणूक होते. प्रत्येक सण, उत्सव साजरा करण्यामागे शास्त्रीय, वैज्ञानिक कारण आहे. आनंदाची देवाणघेवाण करायला शिकवणाऱ्या आपल्या हिंदु संस्कृतीशी तरुणांना जोडून ठेवण्यासाठी नववर्षानिमित्त जल्लोषात निघणाऱ्या शोभायात्रांचा मोलाचा वाटा आहे. मंगलमय आणि चैतन्यमय वातावरणात निघणाऱ्या शोभायात्रांची संकल्पना दरवर्षी वेगवेगळी असते. (Gudi Padwa 2024)

New Project 2024 04 08T164121.195

डोंबिवली

चैत्र पाडव्याच्या दिवशी शोभायात्रा काढण्याची कल्पना गणेश मंदिर संस्थानचे तत्कालीन अध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी मांडली व ती डोंबिवलीकरांनी स्वीकारली. १९९९ साली डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानने गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा सुरू करण्याची मुहूर्तमेढ रोवली. ढोल-ताशांच्या गजरात थिरकणारी तरुणाई, घोड्यांवर बसलेले लहानगे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे, बुलेट अथवा मोटारबाईकवर भगवे फेटे, रेबॅनचे गॉगल, नाकात नथ घालून व नऊवारी परिधान केलेली स्त्रीशक्ती, पारंपरिक वेशातील तरुणाई व पुरुष मंडळी असे हे चित्र असते. या उत्सवी वातावरणाबरोबर स्वच्छता, पाणी बचत, सौरऊर्जेचा वापर, रस्ते सुरक्षा अशा अनेकविध प्रश्नांचा कलात्मक अंगाने आढावा घेणारे चित्ररथ ही शोभायात्रेची अनोखी वैशिष्ट्ये आहेत. यावर्षी श्रीराम मंदिर संकल्पना राबवणार आहे. या संकल्पनेअंतर्गत शोभायात्रेत अयोध्येतील राम मंदिराचा देखावा आणि चित्ररथ शोभायात्रेत पाहायला मिळतील. (Gudi Padwa 2024)

New Project 2024 04 08T164231.969

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेची शोभायात्रा २०२४

वीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार, हिंदू संघटन तसेच जास्तीतजास्त सावरकरप्रेमींना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संस्थेशी जोडण्यासाठी ‘शोभायात्रा’ हे माध्यम आहे. त्यामुळे नववर्षानिमित्त निघणाऱ्या शोभायात्रांचे औचित्त्य साधून यंदा डोंबिवलीतील स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेकडून ‘चित्ररथ’ साकारण्यात येणार आहे. यावेळी वीर सावरकरांनी रचलेली गीते ध्वनिक्षेपकांवर लावली जाणार आहेत. काही ठिकाणी संस्थेची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे दिली जाईल. या शोभायात्रेत ४० सावरकरप्रेमी सहभागी होऊन घोषणा देणार आहेत. (Gudi Padwa 2024)

New Project 2024 04 08T163958.067

ठाणे

ठाण्यातील श्री कौपनेश्वर मंदिराने २००० साली शोभायात्रा सुरू केली. त्यानंतर दरवर्षी शोभायात्रा सुरू झाल्या. घोड्यांवर बसलेले लहानगे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे, नाकात नथ घालून नऊवारी परिधान केलेली स्त्रीशक्ती, पारंपरिक वेशातील तरुणाई, स्वच्छता, पाणी बचत, सौरऊर्जेचा वापर, रस्ते सुरक्षा , अशा अनेक सामाजिक प्रश्न मांडण्यासाठी चित्ररथांची कलात्मक संकल्पना अनोख्या पद्धतीने या दिवशी राबवली जाते. ठाण्यालाही ऐतिहासिक परंपरा आहे. त्यामुळे डोंबिवलीप्रमाणेच ठाण्यातील शोभायात्रेला दरवर्षी हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. (Gudi Padwa 2024)

New Project 2024 04 08T163434.363

गिरगाव-लालबाग-दादर-परळ-चेंबूर-कोपरखैराणे-नवी मुंबई

डोंबिवली, ठाण्यानंतर मुंबई, महाराष्ट्र आणि कालांतराने महाराष्ट्राबाहेरही नववर्षानिमित्त शोभायात्रा काढल्या जाऊ लागल्या. मुंबई-महाराष्ट्रातील शोभायात्रांमध्ये विविध संकल्पना राबवल्या जातात. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि अभिनेत्री आणि राजकारणातील मान्यवर व्यक्तिंचा सहभाग हे गिरगावातील शोभायात्रेचे वैशिष्ट्य सांगता येईल. मुंबईतील दादर, गिरगाव, परळ भागातही या दिवशी जल्लोषाचे वातावरण असते. मल्लखांब प्रदर्शन, महिलांची बाईक रॅली, पुणेरी ढोल-ताशा पथकांमधली जुगलबंदी, महिलांची झांज पथके, मिरवणुकीचे रथ, लाठीकाठीचे शक्ती प्रदर्शन, पारंपारिक पोषाख परिधान केलेले स्त्री-पुरुष, तलवारबाजीचे प्रदर्शन करणाऱ्या मुली अशा प्रकारे दरवर्षी शोभायात्रांची संकल्पना बदलत असते. (Gudi Padwa 2024)

New Project 2024 04 08T163307.169

महाड

महाडमध्ये जाखमाता मंदिरातून सकाळी शोभायात्रेला सुरुवात होते. महाड बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चवदार तळे या भागातून शोभायात्रा निघते. नाणीज येथील नरेंद्र महाराज संस्थानच्या वतीनेही हिंदू नववर्षाच्या निमित्ताने शोभायात्रा काढली जाते. डोक्यावर गुढीचा कलश घेतलेल्या पारंपारिक वेशातील महिला, हातामध्ये गुढी, भगवा फडकवणारे सदस्य, रुद्रशंभू पथकाच्या ढोल-ताशांचा गजर, सामाजिक संदेश देणारे फलक असे या शोभायात्रेचे वेगळेपण सांगता येईल. (Gudi Padwa 2024)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.