Government-Private Colleges : तुमच्या शिक्षणासाठी सरकारी कॉलेजची निवड करताय? चिंता वाटतेय? मग हे वाचा

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर योग्य कॉलेजची निवड करणे हा एक मोठा प्रश्न असतो. कारण तुम्ही कोणते कॉलेज निवडता यावरुन तुमच्या भविष्याचा मार्गदेखील खुला होणार आहे.

199
Government-Private Colleges : तुमच्या शिक्षणासाठी सरकारी कॉलेजची निवड करताय? चिंता वाटतेय? मग हे वाचा

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर योग्य कॉलेजची निवड करणे हा एक मोठा प्रश्न असतो. कारण तुम्ही कोणते कॉलेज निवडता यावरुन तुमच्या भविष्याचा मार्गदेखील खुला होणार आहे. त्याचबरोबर तुमचे कॉलेजमधील पुढील दिवस कसे जाणार आहेत, हे सुनिश्चित होते. आता कॉलेज निवडीमध्ये सर्वात मोठा गोंधळ म्हणजे सरकारी की खाजगी कॉलेज? (Government-Private Colleges)

सरकारी महाविद्यालये :

सरकारी महाविद्यालये/विद्यापीठे ही अशी महाविद्यालये किंवा विद्यापीठे आहेत जी थेट सरकारच्या अखत्यारीत येतात आणि त्यांना सरकारकडून हिस्सा किंवा सर्व निधी मिळतो. (Government-Private Colleges)

खाजगी महाविद्यालये:

खाजगी महाविद्यालये/विद्यापीठे सरकारच्या अखत्यारीत येत नाहीत आणि त्यांचा निधी खाजगी भागधारकांद्वारे वाटप केला जातो. (Government-Private Colleges)

(हेही वाचा – Property Tax : मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही)

सरकारी महाविद्यालये निवडण्याचा मुख्य फायदा म्हणजे त्यांची फी खूपच कमी असते. मात्र शैक्षणिक दर्जा हा शिक्षकांवर अवलंबून असतो आनि सरकारी कॉलेजमध्ये शिक्षक हे उच्च-शिक्षितच असतात. सरकारी महाविद्यालयांची प्लेसमेंट (Placement) पद्धत चांगली असते. त्याचबरोबर कॅम्पस ऍक्टिव्हिटीमध्येही (Campus Activities) हे कॉलेज अग्रेसर असतं. अनेक गोष्टी हाताळण्याची संधी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना मिळते. (Government-Private Colleges)

मात्र सरकारी किंवा खाजगी, कोणत्याही कॉलेजची निवड करताना त्या कॉलेजचा दर्जा नक्की तपासला पाहिजे. या संबंधित माहिती इंटरनेटवर उपलब्ध असते. त्यामुळे सरकारी कॉलेजपेक्षा खाजगी कॉलेज चांगले असतात, या प्रचाराला बळी न पडता तुम्ही स्वतःचा योग्य निर्णय घ्यायला हवा. त्याआधी १० वी पासूनच तुम्ही कॉलेजेसची माहिती मिळवायला सुरुवात करु शकता. तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचे आहे, त्या संबंधित तुमच्या सिनियर अनुभवी विद्यार्थी मित्रांचा सल्ला देखील खूप महत्वाचा ठरतो. (Government-Private Colleges)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.