8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना ८ व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार की नाही? सरकारने स्पष्टचं सांगितलं…

108

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळतो तसेच वर्षातून दोनदा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात देखील वाढ करण्यात येते. परंतु पगारवाढीसाठी हा शेवटचा वेतन आयोग असणार आहे. आठवा वेतन आयोग लागू होणार की नाही याबाबत बऱ्याच दिवसांपासून साशंकता होती यासंदर्भात आता मोदी सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. या माहितीनुसार आठवा वेतन लागू होणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा : Mumbai Local : प्रवाशांसाठी खुशखबर! AC लोकलचा प्रवास होणार आणखी स्वस्त?)

संसदेत अर्थ राज्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

आठवा वेतन आयोग येणार असल्याचा दावा निराधार असून सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले. केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे वेतन, भत्ते सुधारण्यासाठी आठवा वेतन लागू करण्याचा विचार करत आहे का? असा प्रश्न पंकज चौधरी यांना विचारण्यात आला होता यावर सरकारकडून आठवा आयोग येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. पे मॅट्रिक्समध्ये वेळोवेळी बदल व्हायला हवा त्यासाठी पुढील वेतन आयोगाची गरज नाही, सामान्यांना आवश्यक असलेल्या वस्तूंच्या किमती लक्षात घेऊन बदल करण्यात येईल. असेही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले.

नवा फॉर्म्युला येण्याची शक्यता

केंद्र सरकारने वेतनवाढीचा नवा फॉर्म्युला लागू केल्यास जे कनिष्ठ कर्मचारी आहेत त्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. सर्वच प्रकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन २१ हजारांवर पोहोचेल. सर्व कर्मचाऱ्यांना एकाच प्रकारचा लाभ मिळेल यावर सध्या सरकार आपले लक्ष केंद्रीत करत आहे म्हणूनच पगारवाढीसाठी वेतन आयोग न आणता नवा फॉर्म्युला विकसित करण्याचा विचार केंद्राकडून सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.