Kelucharan Mohapatra : प्रख्यात भारतीय शास्त्रीय नर्तक केलुचरण मोहापात्रा

केलुचरण मोहापात्रा यांनी ताल-वाद्यवादनात देखील कौशल्य प्राप्त केले होते.

190
Kelucharan Mohapatra : प्रख्यात भारतीय शास्त्रीय नर्तक केलुचरण मोहापात्रा
Kelucharan Mohapatra : प्रख्यात भारतीय शास्त्रीय नर्तक केलुचरण मोहापात्रा

केलुचरण मोहापात्रा (Kelucharan Mohapatra) हे एक प्रख्यात भारतीय शास्त्रीय नर्तक होते. त्यांनी २० व्या शतकात शास्त्रीय नृत्याचे पुनरुज्जीवन केले आणि ही कला लोकप्रिय बनवण्यात देखील त्यांचे मोठे योगदान आहे. विशेष म्हणजे ओडिसातून पद्मविभूषण प्राप्त करणारे ते पहिले व्यक्ती होते. त्यांचा जन्म १९२६ रोजी ओडिसा येथे झाला.

ते तरुण असताना त्यांनी ओडिसाचा पारंपारिक नृत्य प्रकार म्हणजेच गोटीपुआ नृत्य सादर केले. या नृत्यप्रकारात तरुण मुले भगवान जगन्नाथाची स्तुती करण्यासाठी स्त्री-वेश धारण करतात. या नृत्य प्रकाराने ते इतके प्रभावित झाले की पुढे त्यांनी गोटीपुआ आणि महारी नृत्य प्रकारावर व्यापक संशोधन केले, ज्यामुळे त्यांना ओडिसी नृत्याची पुनर्रचना करण्यात आली.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : भाजप तिसऱ्यांदा जिंकणार की…)

त्यांनी केलुचरण मोहापात्रा (Kelucharan Mohapatra) हे ताल-वाद्यवादनात देखील कौशल्य प्राप्त केले होते. मृदंग, पखवाज व तबला यामध्ये देखील ते कुशल होते. विशेष म्हणजे पारंपरिक पट्टचित्रकला प्रकारातही ते प्रवीण होते. ते नृत्यकलेतले गुरु होते. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री, पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, पद्म विभूषण, मध्य प्रदेश शासनाकडून कालिदास सन्मान असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.