फोनसारखी वाढणार इलेक्ट्रिक वाहने

97

बॅटरीवर चालणा-या कारची पहिली चाचणी 5 सप्टेंबर 1996 रोजी झाली होती. आज 26 वर्षानंतरही अमेरिकेसारख्या प्रगत देशात फक्त 2 टक्के कार बॅटरीवर चालतात. येणारा काळ इलेक्ट्रिक वाहनांविषयी कसा असेल ते जाणून घेऊ.

15 मिनिटांच्या चार्जिंगवर धावणार एक हजार किलोमीटर

सध्या बॅटरी महाग असल्याने आणि त्यांची कामगिरीही म्हणावी तितकी चांगली नसल्याने, इलेक्ट्रिक वाहनांकडे लोक अधिक प्रमाणात वळताना दिसत नाहीत. मात्र बॅटरीमध्ये द्रवपदार्थाऐवजी घन पदार्थाचे इलेक्ट्रोलाइट वापरल्यास सर्व सामान्य कारदेखील केवळ 15 मीनिटांच्या चार्जिंगवर एक हजार किलोमीटर धावू शकेल, असा दावा स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्री- कोर्ट इन्स्टिट्यूट ऑफ एनर्जीचे संचालक प्रो. क्वी यांनी केला आहे.

नवीन बॅटरी सहापट अधिक शक्तीशाली

शक्तिशाली बॅटरी आणण्यास उशिर का होत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे कारण डेंड्राइट आहे. घन पदार्थांच्या क्रॅकिंगला डेंड्राइट म्हणतात. मात्र, आता ही समस्या लवकरच संपेल.

बॅटरीची किमतही 17 टक्के स्वस्त असेल. विशेष बाब म्हणजे ही बॅटरी अतिशय लहान आहे. तसेच, सध्याच्या जड बॅटरीपेक्षा ही सहा पट अधिक शक्तीशाली आहे.

( हेही वाचा: पोह्यांच्या दरात वाढ; कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे उत्पादनावर परिणाम )

फक्त 15 मीनिटे चार्ज केल्यास 80 टक्के चार्ज

जानेवारी 2022 मध्ये, कंपनीने एक चाचणी अहवाल प्रकाशित केला, ज्यानुसार साॅलिड बॅटरी केवळ 15 मीनिटांच्या चार्जिंगमध्ये 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. या 80 टक्के चार्जिंगमध्ये 1 हजार किलोमीटरपर्यंत प्रवास करता येईल. या बॅटरीची चाचणी 3 टप्प्यांत पूर्ण झाली आहे. कंपनीचा दावा आहे की, 2025 पर्यंत ईव्ही कार आजच्या स्मार्टफोनसारख्या सामान्य असतील. त्यांची किमतही सामान्य कारसारखी असेल.

पेट्रोल- डिझेल वाहनांना पर्याय

2025 पर्यंत कमी किमतीत आणि एक हजार किमी अंतर कापणारी इलेक्ट्रिक कार बाजारात आल्यास पेट्रोल- डिझेल वाहनांना मोठा पर्याय निर्माण होणार आहे. त्यामुळे देशाच्या इंधनावर खर्च होणारा पैसाही मोठ्या प्रमाणात वाचणार असून, पर्यावरणही उत्तम राहण्यास मदत होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.