World Vada Pav Day : वडापावच्या जन्माची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का ? जाणून घ्या कशी झाली सुरुवात

232
World Vada Pav Day : वडापावच्या जन्माची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का ? जाणून घ्या कशी झाली सुरुवात
World Vada Pav Day : वडापावच्या जन्माची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का ? जाणून घ्या कशी झाली सुरुवात

आज २३ ऑगस्ट जागतिक वडापाव दिवस. महाराष्ट्रातील प्रसिद्ध वडापाव अनेकांचे पोट भरतो. काहींचा तर सकाळचा नाश्ता ते रात्रीचे जेवण हा वडापावच असतो. मुंबईत येणारे लोक आवर्जून वडापावची चव चाखतात. असेही म्हटल जाते की, वडापाव कधी कोणाला उपाशी झोपू देत नाही. ज्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे, तो वडापाव तरी निश्चित खाऊ शकतो. आजच्या दिवशी जागतिक वडापाव दिवस साजरा केला जात आहे. मुंबईत रस्त्यावरच्या गाडी पासून ते रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला वडा पाव सर्वत्र मिळेल. वडा पावाची किंमत १० रुपयांपासून ते ८० ते १००० रुपयांपर्यंत आहे. जेव्हा वडापाव सुरु झाला, तेव्हा त्याची किंमत अगदी १० रुपयांपेक्षाही कमी होती.

(हेही वाचा – Womens Safety : रेल्वे प्रवास करणाऱ्या स्त्रिया आणि मुलींच्या सुरक्षेसाठी तेजस्विनी पथकाचा पुढाकार, जनजागृती मोहिमेचे आयोजन)

आज वडापाव फक्त मुंबईकरांनाच माहिती आहे असे नाही, तर वडापाव जगप्रसिद्ध आहे. ‘सर्वात वेगवान फास्ट फूड’ म्हणून ओळखला जाणारा हा वडापाव हा मुंबईतील सर्वोत्तम खाद्यपदार्थांपैकी एक मानला जातो.

वडापावचा जन्म कसा झाला ?

आज तुम्हाला मुंबईत दिवसा किंवा रात्री कधीही वडा पाव खायला मिळेल. वडा पाव सुरू झाला, तेव्हा ६ किंवा ७ तासांसाठी उपलब्ध असायला. दुपारी २ ते संध्याकाळी ६ या वेळेत गाडीवर विक्री केली जात असे. पूर्वी तो फक्त मुंबईत काही ठिकाणी उपलब्ध होता. आज मुंबई असो किंवा भारतातील इतर कोणतेही शहर, तुम्हाला वडापाव मिळेल. एवढेच नाही, तर परदेशातही मिळतो. वडापाव हे लोकांच्या उपजीविकेचे अन्न आहे. वडापावचा जन्म १९६६ मध्ये दादर स्टेशनच्या बाहेर अशोक वैद्य यांच्या फूड ट्रकमध्ये झाला होता. सुधाकर म्हात्रे यांचा वडापावही दादरमध्ये सुरू झाल्याचे लोक सांगतात. पूर्वी बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बेसनाच्या पिठात बटाट्याची भाजी तळून वडा बनवायला सुरुवात केली.

परदेशातही आहे प्रसिद्ध

मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी २०१० मध्ये लंडनमध्ये वडापाव सुरू केला. दोन मित्रांनी मिळून हे हॉटेल उघडले आणि आज ते वर्षाला ४ कोटींहून अधिक कमावतात.

वडापावचा इतिहास

जेव्हा १९७० ते १९८० च्या दशकात मुंबईत कंपन्या बंद पडू लागल्या. मग ते मजुरांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले. ठिकठिकाणी गल्लीबोळात हळूहळू वडापावच्या गाड्या दिसू लागल्या. यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वडापावला पाठिंबा देऊन त्या व्यवसायात उतरण्याचे आवाहन मराठी माणसाला केले. मराठी माणसाने व्यवसायात उतरावे, असे त्यांचे मत होते. त्यामुळे वडापावचा छोटासा व्यवसाय सुरू झाला. त्याचवेळी शिवसेनेने दक्षिण भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतल्याने शिवसेनेने मुंबईतील दादर, माटुंगा यांसारख्या भागातील उडुपी हॉटेल्समध्ये दाक्षिणात्य खाद्यपदार्थांचा निषेध करण्यासाठी वडापावचा प्रचार सुरू केला. उडपी ऐवजी वडापाव खायला सुरुवात केली. शिवसेनेने वडापावला राजकीय पातळीवर ब्रँड केले. अशा प्रकारे शिव वडापावचा जन्म झाला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.